Muslim reservation : अबू आझमींचा सभागृहाबाहेर थयथयाट; फाडला मुस्लिम आरक्षणाचा अध्यादेश

203
Muslim reservation : अबू आझमींचा सभागृहाबाहेर थयथयाट; फाडला मुस्लिम आरक्षणाचा अध्यादेश
Muslim reservation : अबू आझमींचा सभागृहाबाहेर थयथयाट; फाडला मुस्लिम आरक्षणाचा अध्यादेश

सरकारने मंगळवार, 20 फेब्रुवारी रोजी विशेष मराठा समाजाला आरक्षण(maratha reservation) देण्यासाठी विशेष अधिवेशन घेतले. यात मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा एकमताने निर्णय झाला. याचा आनंद सर्वत्र साजरा होत असतांना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि शेख रईस यांनी थयथयाट केला आहे.(Muslim reservation)

‘मराठा आरक्षणाचे(maratha reservation) स्वागत आहे. मुसलमान समाजाच्या आरक्षणाचे(Muslim reservation) काय’, असा प्रश्न विचारत आझमी यांनी 2014 मध्ये काढण्यात आलेल्या मुस्लिम आरक्षणाचा अध्यादेश फाडला.

(हेही वाचा- Maratha की Kunbi reservation हवे? सरकारने सर्वेक्षण करावे, सुनील पवारांची मागणी )

मुसलमानांना 5 टक्के आरक्षण

या वेळी अबू आझमी पुढे म्हणाले की, मुसलमान समाजबांधवांना(Muslim reservation) मूर्ख बनवण्याचे काम याआधीच्या सरकारने व या सरकारने देखील केले आहे. 2014 मध्ये मुस्लिमांसाठी 5 टक्के आरक्षणाचा अध्यादेश काढला गेला. त्याची अंमलबजावणी कधी होणार आहे ? त्यामुळे मुस्लिम आरक्षणाच्या(Muslim reservation) अध्यादेशाला काहीही महत्त्व नाही.

रणनिती ठरवणार

मुसलमान आरक्षणासाठी(Muslim reservation) पुन्हा आम्ही लढाई सुरूच ठेवणार आहोत. येत्या काळात नव्याने रणनीती ठरवू आणि आमच्या मागणीचा लढा चालूच ठेवणार आहोत. मुसलमान समाजाची मते सर्वांना हवी आहेत. मुसलमान समाजाच्या आरक्षणावर बोलण्यास कोणी तयार नाही. जर मुस्लिम समाजाने(Muslim reservation) मराठा समाजासारखे(maratha reservation) आंदोलन केले, तर त्यांना गोळ्या मारल्या जातील, असा आरोप अबू आझमी यांनी केला आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.