ठाणे महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयामधील भोंगळ कारभार; उपचार न मिळाल्याने एका दिवसांत पाच रुग्णांचा मृत्यू

98
ठाणे महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयामधील भोंगळ कारभार; उपचार न मिळाल्याने एका दिवसांत पाच रुग्णांचा मृत्यू

ठाणे महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयामधील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने एकाच दिवशी पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, अतिदक्षता विभागात रुग्णाचा मृत्यू होऊन सहा तास उलटून देखील, तो मृतदेह तशाच अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे यामध्ये एका गरोदर महिलेचा देखील समावेश आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

(हेही वाचा – पालकमंत्री पदाचा तिढा सुटलाच नाही; १५ ऑगस्टला झेंडावंदनासाठी तात्पुरती सोय)

घडलेल्या प्रकारावर रुग्णालय प्रशासनाचा खुलासा

दरम्यान, रुग्ण दगावला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यानंतर कळवा रुग्णालय प्रशासनकडून देखील खुलासा करण्यात आला आहे. कळवा रुग्णालयाची रुग्ण दाखल करुन घेण्याची क्षमता संपली असून, आयसीयू देखील फुल असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. जे तीन रुग्ण आले ते गंभीर अवस्थेत होते असा खुलासा प्रशासनाने केला आहे. तसेच पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालय वैद्यकीय अधिकार डॉ.अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली. यामध्ये एका रुग्णाचा हृद्यविकाराच्या झटक्याने, उलटी झाल्याने एका रुग्णाचा, एका अज्ञात, आणि एका रुग्णाच्या पायाला गळू झाला होता. तर एका गरोदर मातेचे मृत्यू झाला असल्याची माहिती देखील माळगावकर यांनी दिली.

नातेवाईकांचा आक्रोश

वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर आक्रोश करत गोंधळ घातला. मोबाईल चार्जिंगचे शंभर, आयसीयू बेडचे २०० तर ऑक्सिजन बेडचे २०० रुपये मागितले जात असल्याचा गंभीर आरोप देखील रुग्णांच्या नातेवाईकांनी यावेळी केला आहे.

सुरक्षा वाढवली

या सर्व प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी देखील प्रकरणाचा आढावा घेत रुग्णालय प्रशासनातला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं हे प्रकरण आता चिघळण्याची चिन्ह दिसत असल्याने रुग्णालयाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्तासोबतच दंगल नियंत्रण पथकाला देखील या ठिकाणी पाचारण करण्यात आलेल आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.