पालकमंत्री पदाचा तिढा सुटलाच नाही; १५ ऑगस्टला झेंडावंदनासाठी तात्पुरती सोय

138
पालकमंत्री पदाचा तिढा सुटलाच नाही; १५ ऑगस्टला झेंडावंदनासाठी तात्पुरती सोय

ऑगस्ट १५ पूर्वी पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल, अशा चर्चा असताना, मंत्रिमंडळ विस्तार केल्याशिवाय पालकमंत्री जाहीर करू नका, अशी ठाम भूमिका शिवसेनेच्या आमदारांनी घेतली आहे. त्यामुळे १५ ऑगस्टला झेंडावंदनासाठी शिंदे-फडणवीस आणि पवारांनी तात्पुरती सोय लावून दिली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, देवेंद्र फडणवीस नागपूर, अजित पवार कोल्हापूर, छगन भुजबळ अमरावती, दिलीप वळसे पाटील वाशीम, हसन मुश्रीफ सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झेंडावंदन करतील. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याची जबाबदारी भाजपाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आहे. तर, दीपक केसरकर सिंधुदुर्गची जबाबदारी सांभाळतील.

(हेही वाचा – Monsoon Update : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; पुणे वेधशाळेने वर्तवला अंदाज)

शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्याकडे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यापैकी रायगडसाठी सुनील तटकरेंच्या कन्या आदिती आग्रही आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या तटकरे यांनी कन्येसाठी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. मात्र, हा जिल्हा राष्ट्रवादीला सोडण्यास शिवसेनेकडून नकार दिला जात आहे. कारण, महाडचे आमदार भरत गोगावले बऱ्याच आधीपासून बाशिंग बांधून बसले आहेत. रायगडच्या पालकमंत्री पदाआडून त्यांची राज्यमंत्री पदावर बोळवण करण्याचा मुख्यमंत्री शिंदेंचा इरादा आहे. त्यामुळे अदिती तटकरे यांना पालघरमध्ये लक्ष घालण्याची सूचना करण्यात आली आहे.

कोण कुठे झेंडावंदन करणार?

१) देवेंद्र फडणवीस – नागपूर
२) अजित पवार – कोल्हापूर
३) छगन भुजबळ – अमरावती
४) सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर
५) चंद्रकांत पाटील – पुणे
६) दिलीपराव वळसे-पाटील – वाशीम
७) राधाकृष्ण विखे-पाटील – अहमदनगर
८) गिरीष महाजन – नाशिक
९) दादाजी भुसे – धुळे
१०) गुलाबराव पाटील – जळगाव
११) रवींद्र चव्हाण – ठाणे
१२) हसन मुश्रीफ – सोलापूर
१३) दिपक केसरकर – सिंधुदुर्ग
१४) उदय सामंत – रत्नागिरी
१५) संदीपान भुमरे – औरंगाबाद
१६) सुरेश खाडे – सांगली
१७) विजयकुमार गावित – नंदुरबार
१८) तानाजी सावंत – धाराशिव
१९) शंभूराज देसाई – सातारा
२०) अतुल सावे – परभणी
२१) अब्दुल सत्तार – जालना
२२) संजय राठोड – यवतमाळ
२३) धनंजय मुंडे – बीड
२४) धर्मराव आत्राम – गडचिरोली
२५) मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
२६) संजय बनसोडे – लातूर
२७) अनिल पाटील – बुलढाणा
२८) अदिती तटकरे – पालघर
२९) रायगड – जिल्हाधिकारी, रायगड
३०) हिंगोली – जिल्हाधिकारी, हिंगोली
३१) वर्धा – जिल्हाधिकारी, वर्धा
३२) गोंदिया – जिल्हाधिकारी, गोंदिया
३३) भंडारा – जिल्हाधिकारी, भंडारा
३४) अकोला – जिल्हाधिकारी, अकोला
३५) नांदेड – जिल्हाधिकारी, नांदेड

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.