Ram Mandir: अयोध्येत प्रथमच विमान उतरले, चाचणी यशस्वी झाल्यावर केंद्रीय मंत्री म्हणाले? वाचा सविस्तर…

अयोध्येत विमान उतरवण्यात आल्याच्या ऐतिहासिक क्षणाची इतिहासात नोंद झाली.

218
Ram Mandir: अयोध्येत प्रथमच विमान उतरले, चाचणी यशस्वी झाल्यावर केंद्रीय मंत्री म्हणाले? वाचा सविस्तर...
Ram Mandir: अयोध्येत प्रथमच विमान उतरले, चाचणी यशस्वी झाल्यावर केंद्रीय मंत्री म्हणाले? वाचा सविस्तर...

मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामाच्या (Ram Mandir) अयोध्या नगरीत प्रथमच विमान उतरले. श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ शुक्रवारी, २३ डिसेंबरला दुपारी एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले.

श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनापूर्वी शुक्रवारी या विमानाची चाचणी घेण्यात आली. चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली आणि धावपट्टी सुरक्षित असल्याचे आढळले. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हेदेखील यावेळी उपस्थित होते. अयोध्येत विमान उतरवण्यात आल्याच्या ऐतिहासिक क्षणाची इतिहासात नोंद झाली.

(हेही वाचा – Eastern and Western Expressway Bridges : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पूल आणि कल्व्हर्टचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट )

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोशल मिडिया ‘X’वर याविषयी लिहिले आहे की, ‘प्रभू श्रीरामाचे जन्मस्थान अयोध्या येथे प्रथमच विमान उतरले. हा राष्ट्रीय सांस्कृतिक वारसा असून आध्यात्मिक पुनरुज्जीवनाप्रती आमची बांधिलकी आहे. हे आमचे समर्पण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येला श्रद्धेचे जागतिक प्रसिद्ध केंद्र म्हणून पुनर्संचयित करण्याच्या हमीचा पुरावा आहे. ‘

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.