IPL 2024, Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने जेव्हा एका चाहत्याला त्याची पर्पल कॅपच भेट दिली…

बुमराहकडून थेट पर्पल कॅपच भेट मिळेल, असं त्या चाहत्यालाही वाटलं नव्हतं

86
IPL 2024, Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने जेव्हा एका चाहत्याला त्याची पर्पल कॅपच भेट दिली…
IPL 2024, Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने जेव्हा एका चाहत्याला त्याची पर्पल कॅपच भेट दिली…
  • ऋजुता लुकतुके

मुंबई इंडियन्सचा तसंच भारतीय संघातील मुख्य तेज गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) लखनौमध्ये सामना खेळत असताना एका चाहत्याला एक अनपेक्षित भेट देऊन खुश केलं. त्याने चक्क आपली मेहनतीने कमावलेली पर्पल कॅप त्यावर स्वाक्षरी करून त्याला भेट दिली. पर्पल कॅप ही स्पर्धेतल्या सर्वात यशस्वी गोलंदाजाला मिळते. त्यामुळे अर्थातच ती मानाची आहे.

पण, बुमराहने ती चाहत्याला दिली. आणि वर त्यावर स्वाक्षरीही केली. मुंबई इंडियन्स फ्रँचाईजीने हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘या लहान मुलाकडे आता आयुष्यभरासाठी एक आठवण तयार झाली आहे,’ असं मुंबई फ्रँचाईजीने या संदेशात म्हटलं आहे. छोट्या चाहत्यालाही या भेटीमुळे आनंद झाला. आणि तो पर्पल कॅप घेऊन गॅलरीभर धावत सुटला. सगळ्यांना तो ही अनपेक्षित भेट दाखवत होता.

(हेही वाचा – Ajit Pawar: शरद पवारांनी कितीवेळा पक्ष बदलला, अजित दादांनी तारखांसह सांगितलं!)

जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) आतापर्यंत या स्पर्धेत १० सामन्यांत १४ बळी मिळवले आहेत. आणि षटकामागे त्याची धावगतीही ६.६४ इतकी कमी आहे. पण, तरीही मुंबई इंडियन्स संघाला फक्त तीनच सामने जिंकता आले आहेत. आणि त्यांनी ७ सामने गमावले आहेत. (IPL 2024)

लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही मुंबईची सुरुवातच खराब झाली. आणि पहिले ४ गडी मुंबईने २७ धावांतच गमावले होते. नेहल वधेराने ४६ आणि टीम डेव्हीने नाबाद ३५ धावा करत मुंबईला निदान १४० चा टप्पा गाठून दिला. विजयासाठी आवश्यक धावा लखनौने ४ गडी आणि ४ चेंडू राखून पूर्ण केल्या. मार्कस स्टॉईनिसने ६२ धावांची खेळी रचली. कमी धावसंख्येच्या या सामन्यात स्टॉईनिसची खेळी निर्णायक ठरली. (IPL 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.