Samsung च्‍या ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’चे धमाक्‍यात पुनरागमन

Samsung.com आणि सॅमसंग एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍टोअर्समध्‍ये स्‍मार्टफोन्‍स, टीव्‍ही, लॅपटॉप्‍स व डिजिटल अप्‍लायन्‍सेसवर अद्वितीय ऑफर्स

427
Samsung च्‍या ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट'चे धमाक्‍यात पुनरागमन

टॅब्‍लेट्स, अॅक्‍सेसरीज आणि वेअरेबल्‍सच्‍या निवडक मॉडेल्‍सवर जवळपास ७७ टक्‍के सूट. गॅलॅक्‍सी एस सिरीज, झेड सिरीज आणि ए सिरीज स्‍मार्टफोन्‍सच्‍या निवडक मॉडेल्‍सवर जवळपास ६४ टक्‍के सूट. निवडक रेफ्रिजरेटर्ससह डिजिटल अप्‍लायन्‍सेसवर जवळपास ४८ टक्‍के सूट आणि निवडक कन्‍वर्टिबल व विंडफ्रीTM एसीवर जवळपास ४७ टक्‍के सूट. निओ क्‍लूएलईउी ८के, निओ क्‍यूएलईडी, क्‍यूएलईडी, ओएलईडी आणि ४के यूएचडी टेलिव्हिजन्‍सच्‍या निवडक मॉडेल्‍सवर जवळपास ४३ टक्‍के सूट. सॅमसंग (Samsung) या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने त्‍यांचा सर्वात मोठा समर सेल ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’ची घोषणा केली आहे, जो Samsung.com, सॅमसंग शॉप अॅप, तसेच सॅमसंग एक्‍सक्‍लुसिव्ह स्‍टोअर्समध्‍ये उत्‍पादनांच्‍या व्‍यापक श्रेणीवर अद्वितीय डिल्‍स आणि आकर्षक कॅशबॅक्‍स देतो. (Samsung)

‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान ग्राहक गॅलॅक्‍सी एस सिरीज, गॅलॅक्‍सी झेड सिरीज आणि गॅलॅक्‍सी ए सिरीज स्‍मार्टफोन्‍सच्‍या निवडक मॉडेल्‍सवर जवळपास ६४ टक्‍के सूटचा आनंद घेऊ शकतात. गॅलॅक्‍सी टॅब्‍लेट्स, अॅक्‍सेसरीज आणि वेअरेबल्‍सचे निवडक मॉडेल्‍स जवळपास ७७ टक्‍के सूटसह उपलब्‍ध असतील. गॅलॅक्‍सी बुक४ सिरीज लॅपटॉप्‍सच्‍या निवडक मॉडेल्‍सच्‍या खरेदीवर ग्राहक जवळपास २४ टक्‍के सूटचा आनंद घेऊ शकतात. सॅमसंग (Samsung) टेलिव्हिजन्‍सचे निवडक मॉडेल्‍स, जसे फ्लॅगशिप निओ-क्‍यूएलईडी ८के, निओ क्‍यूएलईडी, ओएलईडी, द फ्रेम टीव्‍ही आणि क्रिस्‍टल यूएचडी सिरीज जवळपास ४३ टक्‍के सूटसह उपलब्‍ध असतील. निओ क्‍यूएलईडी ८के, निओ क्‍यूएलईडी आणि ओएलईडी टीव्‍हींच्‍या निवडक मॉडेल्‍सच्‍या खरेदीवर ग्राहक जवळपास २०,००० रूपयांच्‍या बँक कॅशबॅकचा लाभ घेऊ शकतात. तसेच, ग्राहक सर्व टेलिव्हिजन्‍सच्‍या खरेदीवर एक्‍स्‍चेंज बोनस म्‍हणून जवळपास ५,००० रूपयांच्‍या फायद्यांचा आनंद घेऊ शकतात. (Samsung)

‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’ २०२४ रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्‍स, मायक्रोवेव्‍ह्ज, मॉनिटर्स आणि एअर कंडिशनर्स अशा अनेक डिजिटल अप्‍लायन्‍सेसवर सूट व अद्वितीय दर ऑफर करेल. आमच्‍या ‘बाय मोअर सेव्‍ह मोअर’ प्‍लॅटफॉर्मसह ग्राहक Samsung.com किंवा सॅमसंग शॉप अॅपच्‍या माध्‍यमातून दोन किंवा अधिक उत्‍पादनांच्‍या खरेदीवर अतिरिक्‍त ५ टक्‍के बचत करू शकतील. ‘बाय मोअर सेव्‍ह मोअर’ प्‍लॅटफॉर्म ग्राहकांना अनेक सॅमसंग (Samsung) उत्‍पादनांवर बंडल ऑफर्सचा आनंद घेण्‍याची सुविधा देतो. उत्‍साह येथेच थांबत नाही, ग्राहक साइड-बाय-साइड रेफ्रिजरेटर्स, आकर्षक फ्रेंच-डोअर रेफ्रिजरेटर्स आणि वैविध्‍यपूर्ण फ्रॉस्‍ट फ्री रेफ्रिजरेटर्स अशा प्रिमिअम अप्‍लायन्‍सेसच्‍या व्‍यापक श्रेणीवर जवळपास ४८ टक्‍के सूटचा आनंद घेऊ शकतात. ते तीन किंवा अधिक निवडक उत्‍पादने खरेदी करत बीस्‍पोक एआय पॅकेजसह त्‍यांच्‍या किचन अनुभवामध्‍ये सुधारणा करू शकतात आणि अतिरिक्‍त १० टक्‍के सूटचा आनंद घेऊ शकतात. (Samsung)

(हेही वाचा – PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभेतून काँग्रेसला तीन आव्हानं!)

मॉनिटर्सचे निवडक मॉडेल्‍स जवळपास ६१ टक्‍के सूटसह उपलब्‍ध

वॉशिंग मशिन्‍सचे निवडक मॉडेल्‍स जवळपास ५० टक्‍के सूटसह उपलब्‍ध असतील. तसेच, ग्राहकांना फुली ऑटोमॅटिक फ्रण्‍ट लोडिंग आणि फुली ऑटोमॅटिक टॉप लोडिंग मशिन्‍ससाठी डिजिटल इन्‍व्‍हर्टर मोटरवर व्‍यापक २० वर्ष वॉरंटी देखील मिळेल. सुलभ उपलब्‍धतेसाठी किफायतशीर ईएमआय पर्याय फुली ऑटोमॅटिक फ्रण्‍ट लोडिंगसाठी फक्‍त १४९० रूपये, फुली ऑटोमॅटिक टॉप लोडिंगसाठी ९९० रूपये आणि सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन्‍ससाठी ७५६ रूपये या स्‍वरूपात उपलब्‍ध आहेत. “आम्‍हाला Samsung.com आणि सॅमसंग एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍टोअर्समध्‍ये बहुप्रतिक्षित समर सेलचे पुनरागमन करण्‍याचा आनंद होत आहे. फॅब ग्रॅब फेस्‍टच्‍या माध्‍यमातून आमचा ग्राहकांना सर्वोत्तम डिल्‍स व ऑफर्स देण्‍याचा मनसुबा आहे. आम्‍हाला ‘बाय मोअर सेव्‍ह मोअर’प्रती प्रेरणादायी अवलंबन दिसण्‍यात येत आहे, ज्‍यामुळे या फॅब ग्रॅब फेस्‍टमध्‍ये आम्‍ही ग्राहकांना संपूर्ण सॅमसंग श्रेणीसह बंडल्‍स तयार करण्‍यासोबत बंडलवर अतिरिक्‍त ५ टक्‍के सूटचा आनंद घेण्‍याची सुविधा देत आहोत. ग्राहकांच्‍या आनंदामध्‍ये अधिक भर करत आम्‍ही निवडक मॉडेल्‍सवर त्‍याच दिवशी डिलिव्‍हरी सेवा देखील देऊ,” असे सॅमसंग इंडियाच्‍या डी२सी बिझनेसचे उपाध्‍यख सुमित वालिया म्‍हणाले. (Samsung)

मॉनिटर्सचे निवडक मॉडेल्‍स जवळपास ६१ टक्‍के सूटसह उपलब्‍ध असतील. तसेच, ग्राहकांना स्‍मार्ट व गेमिंग मॉनिटर्सच्‍या निवडक मॉडेल्‍सच्‍या खरेदीवर कॉम्‍प्‍लीमेण्टरी वॉल माऊंट देखील मिळेल. सॅमसंग सर्व मॉनिटर्सवर ३-वर्ष वॉरंटी आणि जवळपास २० टक्‍के बँक कॅशबॅक (जवळपास १०,००० रूपये) देखील देईल. कन्‍वर्टिबल आणि विंडफ्री™ एसींचे निवडक मॉडेल्‍स जवळपास ४७ टक्‍के सूटसह उपलब्‍ध असतील. ग्राहक विंडफ्री™ एसी मॉडेल्‍सचे दोन किंवा अधिक युनिट्स खरेदी करताना अतिरिक्‍त १० टक्‍के सूटचा देखील आनंद घेऊ शकतात. तसेच, हे मॉडेल्‍स पीसीबी पार्टवर विस्‍तारित वॉरंटीसह येतात, जेथे १ वर्ष स्‍टॅण्‍डर्ड वॉरंटीसह अतिरिक्‍त ४ वर्षांची विस्‍तारित वॉरंटी देण्‍यात येते. आकर्षक बँक ऑफर्सचा भाग म्‍हणून ग्राहक एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि इतर आघाडीच्‍या डेबिट व क्रेडिट कार्ड्सचा वापर करताना जवळपास २२.५ टक्‍के कॅशबॅकच्‍या, तसेच जवळपास २५,००० रूपयांच्‍या अधिकतम कॅशबॅकच्‍या अपवादात्‍मक बचतींचा लाभ घेऊ शकतात. (Samsung)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.