Eastern and Western Expressway Bridges : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पूल आणि कल्व्हर्टचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट

एमएमआरडीएच्या माध्यमातून महापालिकेला हस्तांतरीत केलल्या महामार्गावरील पूल, पादचारी पूल, कल्व्हर्ट, स्कायवॉक आदींचे आता स्ट्रक्चरल ऑडीट केले जाणार आहे.

1092
Eastern and Western Expressway Bridges : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतुकीसाठी बांधणार तीन भुयारे आणि उड्डाणपूल

एमएमआरडीएच्या (MMRDA) माध्यमातून महापालिकेला हस्तांतरीत केलल्या महामार्गावरील पूल, पादचारी पूल, कल्व्हर्ट, स्कायवॉक आदींचे आता स्ट्रक्चरल ऑडीट केले जाणार आहे. यासर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीटचे अहवाल पूर्ण झाल्यांनतर किरकोळ तथा मोठ्या स्वरुपाची दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी आदींच्या कामांचे स्वरुप ठरवून त्यांची डागडुजी केली जाणार आहे. (Eastern and Western Expressway Bridges)

मुंबईत पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग एमएमआरडीए (MMRDA) महापालिकेला कायमस्वरुपी हस्तांतरीत करण्यात आला. त्यानुसार या महामार्गावरील पुलांचे तसेच पादचारी पुलांसह कल्व्हर्टच्या बांधकामांची स्थैर्यता तपासून त्यांचे लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. बांधकामाच्या लेखा परीक्षणासाठी वीरमाता जिजाबाई टेक्नॉलोजिकल इन्स्टिट्युट अर्थात व्हीजेटीआय यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. (Eastern and Western Expressway Bridges)

(हेही वाचा – Mumbai Pune Expressway : सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी)

पूर्व द्रुतगती महामार्गावर सुमारे १४ ते १५ पूल व कल्व्हर्ट आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर सुमारे ४० पूल आणि कल्व्हर्ट आहेत. त्यामुळे या दोन्ही महामार्गाची सुधारणा करताना या मार्गावरील पुलांची डागडुजी करण्याच्या दृष्टीकोनातून हे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार यासाठी ९० लाख रुपये खर्च केले जाणार आहे. हा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसून या स्ट्रक्चरल ऑडीटच्या अहवालानंतर या मार्गावरील पुलांची तसेच कव्हर्टच्या किरकोळ तसेच मोठ्या स्वरुपातील कामांचे स्वरुप ठरवून त्यानुसार यासर्वांची डागडुजी केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Eastern and Western Expressway Bridges)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.