Pune : पुण्यात भरले शिवकालीन सुवर्णमुद्रा दुर्मीळ नाण्यांचे प्रदर्शन

246

पुण्यातील (Pune) कर्वे रस्त्यावरील सोनल हॉलमध्ये ‘कॉईनेक्स पुणे’ या आंतरराष्ट्रीय दुर्मीळ नाणे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटम्स् यांच्यातर्फे शुक्रवार, २२ डिसेंबर ते रविवार, २४ डिसेंबर या कालावधीत हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत भरवण्यात आले आहे.

३५०व्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ विशेष कव्हरचे प्रकाशन 

प्रदर्शनाचे हे २८वे वर्षे आहे. यामध्ये प्राचीन, मुघल, नजराणा, मराठा, एरर अशा दुर्मीळ आणि प्राचीन नाण्यांची वैविध्यता पुणेकरांना (Pune) बघायला मिळत आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजता किशोर झुनझुनवाला यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन झाले. त्यावेळी पुण्याचे प्रदीप सोहोनी, डॉ. अभिजित दांडेकर, मुंबईचे गिरीश जगशी वीरा, नागपूरचे डॉ. प्रशांत पी. कुलकर्णी, ठाण्याचे सुबोध एस. पेठे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याच दिवशी दुपारी चार वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या ३५०व्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ विशेष कव्हरचे प्रकाशन आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मराठा सरदार कुटुंबातील सदस्य विक्रमसिंह पाटणकर, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, दाभाडे राजघराण्याचे १३वे वंशज श्रीमंत सरदार सत्यशीलराजे दाभाडे, छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज श्री विक्रमसिंह मोहिते आणि श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगडचे अध्यक्ष सुनील पवार यांच्या हस्ते झाले. या प्रत्येक कव्हरवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘होन’ नाण्यावर गोल्ड प्लेटेडच्या ऑबव्हर्स आणि रिव्हर्स प्रतिकृती व खास सोनेरी कॅन्सलेशन केले आहे. यावेळी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सुनील पवार यांचा सत्कार करण्यात आला.

(हेही वाचा PM Narendra Modi : २०२४ च्या निवडणुकीत २०१९ चा रेकॉर्ड मोडायचा आहे; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.