PM Narendra Modi : २०२४ च्या निवडणुकीत २०१९ चा रेकॉर्ड मोडायचा आहे; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

२०१९ मधील लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाचा विक्रम मोडून काढेल असा विजय २०२४ च्या निवडणुकीत मिळविण्याचे टार्गेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांना दिले आहे.

162
PM Narendra Modi यांचा १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौरा
PM Narendra Modi यांचा १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौरा

राजस्थानसह तीन राज्यांत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भारतीय जनता पक्षाचा (Bharatiya Janata Party) आत्मविश्वास बळावला आहे. २०१९ मधील लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाचा विक्रम मोडून काढेल असा विजय २०२४ च्या निवडणुकीत मिळविण्याचे टार्गेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांना दिले आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन (Parliament Winter Session) संपताच भारतीय जनता पक्षाने २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची मोहिम हाती घेतली आहे. भाजपने निवडणुकीच्या तयारीसाठी दोन दिवसाची बैठक बोलाविली होती. काल शुक्रवारपासून सुरू झालेलया बैठकीचा आजचा दुसरा दिवस होय. गृहमंत्री अमित शहा मुख्यालयात दाखल झालेले आहेत. (PM Narendra Modi)

३०३ जागांचा रिकॉर्ड मोडून नवीन रेकॉर्ड रचला गेला पाहिजे

महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मोठे लक्ष्य दिले आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपला ३०३ जागा मिळाल्या होत्या. मात्र, २०२४ च्या निवडणुकीमध्ये ३०३ जागांचा रिकॉर्ड मोडून नवीन रेकॉर्ड रचला गेला पाहिजे, असे आवाहन मोदी (PM Narendra Modi) यांनी केले आहे. भाजपच्या (BJP) राष्ट्रीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी पक्षाच्या अधिकाऱ्यांना मिशन मोडमध्ये काम करण्यास सांगितले. याशिवाय केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचवावी, असेही बैठकीत सांगण्यात आले. (PM Narendra Modi)

दीनदयाल उपाध्याय मार्गावरील भाजपच्या मुख्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांची ही बैठक सुरू आहे. शनिवारी (२३ डिसेंबर) बैठकीचा दुसरा दिवस आहे. या बैठकीसाठी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा शनिवारी सकाळी पक्षाच्या मुख्यालयात पोहोचले. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील भाजप मुख्यालयात पोहोचले आहेत. याआधी शुक्रवारी बैठकीच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि इतर प्रमुख नेत्यांनीही बैठकीला हजेरी लावली होती. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Ghar Wapasi : छत्तीसगडमध्ये २४ डिसेंबरला १०१ कुटुंबे स्वीकारणार हिंदू धर्म)

भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीची रूपरेषा ठरू ठरविली जाणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीसाठी संघटनेच्या नेत्यांच्या जबाबदाऱ्यांवर चर्चा होऊ शकते. याशिवाय विकसित भारत संकल्प यात्रेबाबतही चर्चा होणार आहे. यात सर्व प्रदेशाध्यक्ष, संघटना सरचिटणीस, राष्ट्रीय अधिकारी आणि देशभरातील सर्व मोर्चांचे अध्यक्ष सहभागी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुकीचा आढावादेखील या बैठकीत घेतला जाणार आहे.विविध राज्यातील पक्षाच्या कामगिरीचा व निवडणुकीच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार असून त्यानुसार प्रत्येक राज्यांत उपाययोजना सुचविल्या जाणार आहेत. (PM Narendra Modi)

सोशल मीडियावर सक्रिय राहण्याच्या सूचना

बैठकीच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले की, महिला, तरुण, शेतकरी आणि गरीब या चार जाती लक्षात ठेऊन काम करायचा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत देशाला जातींमध्ये विभागण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण माझ्यासाठी फक्त चार जाती महत्त्वाच्या आहेत आणि त्या महिला शक्ती, युवा शक्ती, शेतकरी आणि गरीब कुटुंबे आहेत. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी मिशन मोडमध्ये काम करणे आणि केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची जास्तीत जास्त माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासोबतच सोशल मीडियावर सक्रिय राहण्याच्या सूचनाही केल्या आहेत. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप बूथ स्तरावर १० टक्के मते वाढवण्याच्या उद्देशाने काम करत आहे. यासाठी बूथ व्यवस्थापन मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे. (PM Narendra Modi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.