Para Share Entertainment : पराशरेंच्या ‘पॅराशेअर’चं भारतात दमदार पदार्पण

121
Para Share Entertainment: पराशरेंच्या ‘पॅराशेअर’चं भारतात दमदार पदार्पण
Para Share Entertainment: पराशरेंच्या ‘पॅराशेअर’चं भारतात दमदार पदार्पण

अमेरिकेसह जगभर आपल्या नावाचा ठसा उमटवल्यानंतर हर्षद पराशरेंची (Harshad Parashare) पॅराशेअर एन्टरटेन्मेट्स (Para Share Entertainment) ही कंपनी आता तीन मोठ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून भारतात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. जगभारात ३५० पेक्षा अधिक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केल्यानंतर पॅराशेअर एन्टरटेन्मेट्स (Para Share Entertainment) भारतीय रसिकांसाठी सांगितीक मेजवानी घेऊन आली आहे.

(हेही वाचा –Ajit Pawar: शरद पवारांनी कितीवेळा पक्ष बदलला, अजित दादांनी तारखांसह सांगितलं!)

राजस्थानी गायकीचा ढंग देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे गायक कोक स्टूडीओ फेम मामे खान, आपल्या सतार वादनातून श्रोत्यांच्या काळजाची तार छेडणारे पुरबियान चॅटर्जी आणि आपल्या सुगम आणि शास्त्रीय गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका आर्या आंबेकर यांच्या कार्यक्रमासह पॅराशेअर एन्टरटेन्मेंट (Para Share Entertainment) ही कंपनी महाराष्ट्रातल्या रसिकांसाठी पर्वणी घेऊन येतेय.

आपल्या आवाजातील गोडव्याने रसिकांच्या मनात अढळस्थान प्राप्त केलेल्या आर्या आंबेकरचे ५ मे रोजी मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात तर २२ मे रोजी बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे रंगमंदीर येथे कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये कधीही न अनुभवलेलं असं आर्याचं पूर्णतः वेगळं सादरिकरण प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. (Para Share Entertainment)

(हेही वाचा –PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभेतून काँग्रेसला तीन आव्हानं!)

११ मे रोजी मुंबईच्या राॅयल ओपेरा हाऊसमध्ये मामे खान आणि पंडित पुरबियान चॅटर्जी यांची मैफल आयोजित केली आहे. ११ मे च्या संध्याकाळी राजस्थानी ठेका आणि बंगाली गोडवा यांचं फ्युजन संगीत रसिकांसाठी पर्वणी ठरेल. (Para Share Entertainment)

या तिन्ही कार्यक्रमांचे दिग्दर्शन हे पॅराशेअर एन्टरटेन्मेट्सटे संस्थापक हर्षद पराशरे यांनी केले आहे. त्यांचा मराठी रंगभूमीचा अनुभव आणि दिग्दर्शनाची अनोखी शैली यामुळे या कार्यक्रमांची रंगत आणखीनच वाढणार आहे. (Para Share Entertainment)

(हेही वाचा –IPL 2024, Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने जेव्हा एका चाहत्याला त्याची पर्पल कॅपच भेट दिली…)

“भारतामध्ये भारतीय कलाकारांसोबत पदार्पण करताना आमच्या मनात आनंद आणि समाधान आहे. आजवर आम्ही भारतीय कलाकारांना जगभरातलं व्यासपीठ उपलब्ध करुन देत होतो, पण आता भारतातल्या दर्दी रसिकांसाठी आम्ही कार्यक्रम आयोजित करणार आहोत. आम्ही भारतात कार्यक्रम करावेत यासाठी गेली पाच वर्ष आम्हाला आग्रह केला जात होता आणि रसिक मायबापांची ही इच्छा अखेर आम्ही पूर्ण करत आहोत. भारताने अनेक दिग्गज कलाकार या जगाला दिले. तो वारसा जपणं, पुढे नेणं ही आमची जबाबदारी आहे. जगभरातल्या रसिकांसाठी कार्यक्रम केल्यानंतर आता भारतीयांसाठी जागतिक पातळीचे कार्यक्रम करताना आम्हाला फार आनंद होतोय” अशी प्रतिक्रिया हर्षद पराशरे यांनी दिली आहे. (Para Share Entertainment)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.