Palghar Lok Sabha Constituency : उबाठा शिवसेनेकडून पालघरमधून माजी आमदाराला उतरवणार निवडणुकीत?

पालघर मतदार संघ पुन्हा आपल्याकडे घेण्याचा भाजपाचा प्रयत्न

168
Palghar Lok Sabha Constituency : उबाठा शिवसेनेकडून पालघरमधून माजी आमदाराला उतरवणार निवडणुकीत?

पालघर लोकसभा मतदार संघ (Palghar Lok Sabha Constituency) हा सध्या शिवसेनेकडे असला तरी हा मतदार संघ पुन्हा आपल्याकडे घेण्यासाठी भाजपाचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे पूर्वी काँग्रेसमधून भाजपाकडे आलेले आणि पुन्हा शिवसेनेकडे पाठवलेल्या राजेंद्र गावित यांना मतदार संघासह आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न भाजपाचा सुरु आहे. मात्र, आता चिंतामण वनगा हेही शिवसेनेत असल्याने उबाठा शिवसेनेने तब्बल तीन वेळा आमदार राहिलेल्या माजी आमदाराला गळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पालघरमधील माजी आमदाराला उबाठा शिवसेनेच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरवण्याचा विचार सुरु असल्याचे बोलेले जात आहे. (Palghar Lok Sabha Constituency)

पालघर लोकसभा मतदार संघ (Palghar Lok Sabha Constituency) म्हणून स्थापन होत प्रथम २००९मध्ये सार्वत्रिक निवडणूक पार पडली. या पहिल्या निवडणुकीत पालघर लोकसभा मतदार संघाचा गड बहुजन विकास आघाडी सर करत बळीराम जाधव हे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर सन २०१४मध्ये भाजपाचे चिंतामण वनगा हे खासदार म्हणून निवडून आले होते. परंतु त्यांचे निधन झाल्यानंतर सन २०१८मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांना भाजपाने नाकारली आणि काँग्रेसमधून प्रवेश करणाऱ्या राजेंद्र गावित यांना भाजपैने उमेदवार म्हणून घोषित केले होते. सन २००९मध्ये राजेंद्र गावित काँग्रेसचे आमदार म्हणून विजयी झाले होते, त्यानंतर पुढील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. गावित यांना भाजपाने उमेदवारी दिल्याने श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यात राजेंद्र गावित हे २,७२,७८२ मते मिळवत विजयी झाले होते आणि शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांना २,४२,२१० मते मिळाली होती, तर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना २,२२,८३८ मते मिळाली होती. (Palghar Lok Sabha Constituency)

(हेही वाचा – Narendra Modi: राज्यात मोदी-शाह फुंकणार प्रचाराचे रणशिंग; रामटेकमध्ये मोदींची पहिली सभा)

परंतु सन २०१९मच्या निवडणुकीत पालघर लोकसभा मतदार संघ शिवसेनेला सोडण्यात आला आणि त्यासाठी भाजपाचे उमेदवार असलेले राजेंद्र गावित यांना शिवसेनेत पाठवण्यात आले होते. गावित यांनी शिवसेना प्रवेश केल्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. या निवडणुकीत गावित यांना ५,१५,००० मते मिळाली होती, तर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांना ४,९१,५९६ मते मिळाली होती. परंतु आता हाच मतदार संघ पुन्हा एकदा भाजपाकडे जाणार असून मतदार संघासोबत राजेंद्र गावित हेही सन २०१९ची पुनर्रावृत्ती करत भाजपात प्रवेश करून भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. (Palghar Lok Sabha Constituency)

मात्र, हा मतदार संघ भाजपाला सोडणार असल्याने यासाठी उमेदवारही भाजपाकडे स्वगृही परतणार आहे. त्यामुळे उबाठा शिवसेनेचा उमेदवारासाठी शोध सुरु असून पालघर विधानसभा क्षेत्रातून सलग तिन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या माजी आमदाराला निवडणूक रिंगणात उतरवण्याचा विचार सुरु आहे. यासाठी उबाठा शिवसेनेत गाठीभेटी निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, या मतदार संघात बहुजन विकास आघाडीची मोठी ताकद असल्याने बळीराम जाधव यांच्या ऐवजी आता बविआ कुणाला निवडणूक रिंगणात उतरवणार की भाजपाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Palghar Lok Sabha Constituency)

आतापर्यंत निवडून आलेले खासदार
  • सन २००९ मध्ये : बळीराम जाधव, बहुजन विकास आघाडी.
  • सन २०१४ मध्ये : चिंतामण वनगा, भाजपा.
  • सन २०१८ : राजेंद्र गावित, भाजपा, पोटनिवडणूक.
  • सन २०१९ : राजेंद्र गावित, शिवसेना. (Palghar Lok Sabha Constituency)
सन २०१९ मधील सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल
  • शिवसेना : राजेंद्र गावित, ५,१५, ००० मतदान.
  • बविआ : बळीराम जाधव, ४,९१,५९६ मतदान.
  • वंचित : सुरेश पाडावी, १३,७२८ मतदान. (Palghar Lok Sabha Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.