Ajit Pawar: शरद पवार मनामध्ये असतं तेच करतात, अन् संभ्रम निर्माण करतात; अजितदादांचा हल्लाबोल

82
Ajit Pawar: शरद पवार मनामध्ये असतं तेच करतात, अन् संभ्रम निर्माण करतात; अजितदादांचा हल्लाबोल
Ajit Pawar: शरद पवार मनामध्ये असतं तेच करतात, अन् संभ्रम निर्माण करतात; अजितदादांचा हल्लाबोल

शरद पवार (Sharad Pawar) मनामध्ये असतं तेच करतात, परंतु दाखवताना तो सामूहिक निर्णय असल्याचे दाखवतात. अन् संभ्रम निर्माण करतात. असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवार यांचा विधानावर हल्लाबोल केला आहे. शरद पवारांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एक खुलासा केला होता. शरद पवार यांनी देशातील प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य केले होते. यावर आता अजितदादांनी (Ajit Pawar) पलटवार केला आहे.

शरद पवार यांच्याकडून संभ्रम निर्माण करण्यासाठी वक्तव्य

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “शरद पवार यांच्याकडून संभ्रम निर्माण करण्यासाठी वक्तव्य केली जातात. त्यांना पाहिजे तेच ते करतात. तो त्यांचा स्वभाव आहे. तो बदलणे शक्य नाही. आम्हाला मध्येच ते म्हणतात मी निवृत्त होतो. परंतु त्यांच्या मनामध्ये वेगळेच असते. जे मनामध्ये असते तेच ते करतात. परंतु दाखवताना हा निर्णय सामूहिक असल्याचे दाखवतात. भाजप बरोबर जाण्याची चर्चा झाल्याचे शरद पवार आता किमान मान्य करत आहेत. यासाठी सहा बैठका झाल्या होत्या. जर भाजप सोबत जायचे नव्हते तर का झाल्या होत्या या बैठका?” असा सवाल अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपस्थित केला.

शरद पवार कुणाचं ऐकत नाही, ते हवं तेच करतात

“शरद पवार कुणाचं ऐकत नाही, ते हवं तेच करतात. तो त्यांचा स्वभाव आहे. निलेश लंके याने पक्ष सोडला. पण पुन्हा त्याला पक्षात घेतले. राजकारणात कुणी कुणाचं कायमचं शत्रू आणि विरोधक नसतं. लोकांमध्ये संशय कल्लोळ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अमित शाह महाराष्ट्राचं राजकारण चालवतायेत हे धादांत खोटे आहे. आम्ही आमच्या पक्षाची भूमिका एकत्र बसून घेतो. कुणाच्या सांगण्याने राजकारण करणारी आम्ही नव्हे.” असं अजित पवारांनी (Ajit Pawar) स्पष्ट केलं.

रोहितचं मानसिक संतुलन बिघडलं

“ठाकरे काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करतील असे वाटत नाही. मी अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांना पाहिले आहे. एकंदरीत ते असा काही निर्णय घेण्याची शक्यता नाहीच. रोहितचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यामुळे अलीकडे तो काहीही बडबडायला लागलाय.” असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.