Konkan Railway 2024: यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे होणार हाल!

नियमित गाड्यांची ४ आणि ५ सप्टेंबरची तिकीट ‘फुल्ल’ झाल्याने चाकरमान्यांची चिंता वाढली, अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडा प्रवासी संघटनांकडून मागणी

145
Konkan Railway 2024: यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे होणार हाल!

कोकणात शिमग्यानंतर चाकरमानी आवर्जून वाढ बघतो ती गणेशोत्सवासाची (Konkan Ganeshotsav) मात्र, यंदा या चाकरमान्याला प्रवासात काहीसा त्रास सहन करावा लागणार आहे. तसेच कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावर १० जून ते ३१ ऑक्टोबरदरम्यान पावसाळी वेळापत्रक (Konkan Railway Monsoon Schedule 2024) लागू होणार आहे. या काळात सीएसएमटी-मडगाव वंदे भारत (CSMT-Margaon Vande Bharat) आणि तेजस एक्स्प्रेस (Tejas Express) आठवड्यातून तीन दिवस, तर एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस आठवड्यातून दोन दिवस चालविण्यात येणार असल्याने गाड्यांची संख्या कमी असणार आहे. त्यातच नियमित गाड्यांची ४ आणि ५ सप्टेंबरची तिकीट ‘फुल्ल’ झाल्याने चाकरमान्यांची चिंता वाढली आहे. यामुळे कोकणात जाण्यासाठी अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडाव्यात अशी मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.  (Konkan Railway 2024)

कोकणातून कामानिमित्त मुंबईत आलेल्या चाकरमान्याची संख्या सुमारे २५ टक्के 

यंदा ७ सप्टेंबरला गणरायाचे आगमन होणार आहे. त्याआधी दोन दिवस कोकणात पोहोचण्यासाठी चाकरमनी  प्रयत्नशील असतात. कोकणात नियमितपणे जाणाऱ्या रेल्वे ४ आणि ५ सप्टेंबर रोजी ‘फुल्ल’ झाल्या आहेत.  त्यामुळे आता रेल्वे गणेशोत्सवाकरिता स्पेशल ट्रेनची कधी घोषणा करते याची काळजी चाकरमान्यांना लागली आहे. तसेच मुंबईतील  लोकसंख्येच्या सुमारे २५ टक्के चाकरमानी हे कोकणी बांधव आहेत. तसेच मुंबई आणि शहरातून गणेशोत्सवाकरिता सुमारे तीन ते साडेतीन लाख चाकरमानी कोकणात जातात. (Konkan Railway 2024)

(हेही वाचा – Dawood Drug Connection : कवठेमहांकाळ ड्रग्सचे दाऊद कनेक्शन उघड, परदेशात बसलेल्या दाऊद च्या सदस्याला लूक आउट नोटीस)

पावसाळी वेळापत्रकात यंदाच्या वेळी २२११९ सीएसएमटी-मडगाव तेजस एक्स्प्रेस मंगळवार, गुरुवार आणि शनिवार, २२२९ सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस सोमवार, बुधवार, शुक्रवारी तर २२२३० मडगाव-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी धावणार आहे. याशिवाय ११०९९ एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस शुक्रवार, रविवारी चालविण्यात येणार आहे. तर यंदा सुमारे साडेतीन हजार गाड्या चालविण्याचे एस.टी. महामंडळाचे नियोजन आहे. (Konkan Railway 2024)

हेही पाहा –  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.