Oshiwara River : पंडित दीनदयाल उपाध्याय उद्यानाची भिंत केली ओशिवरा नदीने कमजोर

पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ओशिवरा नदीच्या पातमुखाशी असून भरती आणि ओहोटीच्या परिणाम या परिसरात होतो. हा भाग पातमुखाशी असल्याने तो संरक्षित करणे तसेच या भागाचे रुंदीकरण करणे अत्यावश्यक आहे.

460
Oshiwara River : पंडित दीनदयाल उपाध्याय उद्यानाची भिंत केली ओशिवरा नदीने कमजोर

अंधेरी पश्चिम येथील पंडित दीनदयाल उपाध्याय उद्यानाची संरक्षक भिंत ओशिवरा नदीमुळे कमजोर झाली असून ही संरक्षक भिंत केव्हाही कोसळण्याची भिंत वर्तवली जात आहे. त्यामुळे या उद्यानाला जोडून असलेल्या नदीच्या संरक्षक भिंतीचे काम त्वरीत करण्याची मागणी केली जात आहे. (Oshiwara River)

अंधेरी पश्चिम येथील विंडरमेयर को ऑप हौसिंग सोसायटीच्या लगत असलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय उद्यानाशेजारुन ओशिवरा नदी जात असून या नदीची आणि उद्यानाची संरक्षक भिंत एकच आहे. त्यामुळे उद्याना लगत असलेली ही संरक्षक भिंत अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. पावसाळ्यात कोसळण्याची भीती वर्तवली जात आहे. पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ओशिवरा नदीच्या पातमुखाशी असून भरती आणि ओहोटीच्या परिणाम या परिसरात होतो. हा भाग पातमुखाशी असल्याने तो संरक्षित करणे तसेच या भागाचे रुंदीकरण करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे या नाल्याच्या भागाचे रुंदीकरण करून आर सी सी संरक्षक भिंतीचे काम हाती घेण्यात येत आहे. (Oshiwara River)

(हेही वाचा – Solapur मतदार संघात राष्ट्रवादीचा माजी आमदार AIMIM चा उमेदवार?)

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यासाठीची निविदा काढण्यात आली आहे. त्यामध्ये पात्र कंपनीची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या भिंतीचे काम त्वरीत हाती घेण्यात येणार आहे. हे काम पावसाळा वगळून १२ महिन्यांमध्ये पूर्ण करणे अपेक्षित आहे. महापालिकेने मागवलेल्या या निविदेमध्ये स्वतिक कन्स्ट्रक्शन या कंपनीची निवड करण्यात आली. यासाठी विविध करा २१ कोटी ७७ लाख ४८ हजार रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. (Oshiwara River)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.