Narendra Modi: राज्यात मोदी-शाह फुंकणार प्रचाराचे रणशिंग; रामटेकमध्ये मोदींची पहिली सभा

118
Narendra Modi: राज्यात मोदी-शाह फुंकणार प्रचाराचे रणशिंग; रामटेकमध्ये मोदींची पहिली सभा
Narendra Modi: राज्यात मोदी-शाह फुंकणार प्रचाराचे रणशिंग; रामटेकमध्ये मोदींची पहिली सभा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) १० एप्रिल रोजी महाराष्ट्रात येत आहेत. पंतप्रधानांची रामटेक येथे पहिली जाहीर सभा घेण्यात येणार आहे. त्यानंतर १४ एप्रिलला दीक्षाभूमी येथे दर्शन व चंद्रपूर येथे जाहीर सभा नियोजित आहे, अशी माहिती भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ५ किंवा ६ एप्रिल रोजी विदर्भात सभा होणार आहे. निवडणुक व्यवस्थापन समितीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दरेकरांनी (Pravin Darekar)ही माहिती दिली. (Narendra Modi)

(हेही वाचा-Narayan Rane : उद्धव ठाकरे, राहुल गांधींना मतदारच तडीपार करतील; नारायण राणेंचा घणाघात)

प्रवीण दरेकर (Pravin Darekar) म्हणाले, “भाजप हा पक्ष निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत नियोजनबद्द, कालबद्ध आणि समयसूचक काम करणारा पक्ष आहे. पक्षाची निवडणूक व्यवस्थापन समिती ही निवडणुकीत अत्यंत महत्त्वाची भुमिका निभावत असते. महाराष्ट्राच्या व्यवस्थापन समितीची बैठक प्रभारी डॅा. दिनेश शर्मा (Dr. Dinesh Sharma) यांच्या उपस्थितीत पार पडली. मार्गदर्शक सूचना डॅा. दिनेश शर्मा (Dr. Dinesh Sharma) यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. प्रत्येकावर जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेकजण इच्छुक असतात. काही जण उमेदवारी मिळाली नाही, तरी पक्षाच्या विचाराशी एकनिष्ठ राहून काम करतात आणि एखाद्याला निवडणूकच लढवायची असेल, तर इतर पक्षात जाण्याची भूमिका अनेक लोकं अनेक पक्षात घेताना दिसतात. तशी भूमिका उन्मेष पाटील यांची आहे का? हे लवकरच समजेल.” असं दरेकर (Pravin Darekar)म्हणाले. (Narendra Modi)

(हेही वाचा- उष्माघात टाळण्यासाठी आरोग्याची काळजी कशी घ्याल?)

“ठाकरेंना (Uddhav Thackeray)दुसऱ्यांनी टाकलेलेच उचलावे लागणार आहे. स्वतःकडे उमेदवार नाहीत. जे चांगले उमेदवार होते, ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. उबाठा सेनेच्या उमेदवारांवर नजर टाकली, तर सर्व उमेदवार आयात करून निवडणुका लढवत आहेत. रिकाम्या जागा भरण्याचा उबाठा सेनेचा प्रयत्न सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची काल परभणी येथे सभा झाली. त्या सभेत सांगण्यात आले की, कुणाचा बापही संविधान बदलणार नाही. एवढे संविधान आपले पवित्र, ताकदवान आहे. परंतु विरोधकांकडे निवडणुकीला मुद्देच राहिले नाहीत. मोदींच्या कर्तृत्वावर, विकासकामांवर, देशाच्या प्रगतीवर बोलण्यासाठी कुठलाही मुद्दा नाही. जनतेच्या प्रश्नाबाबत बोलत नाहीत. केवळ भावनिक वातावरण करता येते का? अशा प्रकारचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.” अशी टीका प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी मविआवर केली आहे. (Narendra Modi)

हे पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.