North West Lok Sabha Constituency : वायकर यांच्यापेक्षा पोंक्षेंच्या नावाला भाजपाची अधिक पसंती

विद्यमान शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांच्या उत्तर पश्चिम या लोकसभा मतदार संघावर भाजपाने आपला दावा ठोकण्यास सुरुवात केला असतानाच या मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उबाठा पक्षाने अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

420
North West Lok Sabha Constituency : वायकर यांच्यापेक्षा पोंक्षेंच्या नावाला भाजपाची अधिक पसंती

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात गजानन किर्तीकर यांच्या ऐवजी शिवसेनेकडून आमदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) तसेच अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांच्या नावाची चर्चा जोरात सुरु आहे. रविंद्र वायकर यांनी उबाठा शिवसेनेतून मुख्यमंत्री मुख्यनेता असलेल्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे वायकर यांनी या मतदारसंघात उभे राहावे असे मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे, पण त्याबरोबरच शरद पोंक्षे यांच्याही नावाची चर्चा सुरु आहे. वायकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना टक्कर देतील असे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात भाजपामधून त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विरोध होत आहे, दुसरीकडे पोंक्षे यांच्यासाठी पोषक वातावरण आहे. पोंक्षे यांना निवडून आणण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते जीवाचे रान करतील आणि दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्तेही त्यांच्यासाठी विशेष मेहनत घेतील असे बोलले जात आहे. (North West Lok Sabha Constituency)

शिवसेना प्रवेशानंतरही काहीशी नाराजी भाजपामध्ये उमटली होती!

शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांच्या उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघावर भाजपाने आपला दावा ठोकण्यास सुरुवात केला असतानाच या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उबाठा पक्षाने अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा केलेली आहे. त्यातच आता या मतदारसंघातून जोगेश्वरी विधानसभेचे आमदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. वायकर यांच्याबरोबरच आता अभिनेते शरद पोंक्षे यांच्या नावाचीही चर्चा जोरात सुरु आहे. रविंद्र वायकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतरही काहीशी नाराजी भाजपामध्ये उमटली होती, ती नाराजी आता त्यांच्या नावाची चर्चा सुरु होताच अधिक तीव्र होत असल्याचे दिसते आहे. (North West Lok Sabha Constituency)

भाजपाचे पदाधिकारी युतीधर्म म्हणून काम करणार

जोगेश्वरी विधानसभेचे आमदार म्हणून काम करताना वायकर यांनी भाजपाच्या अनेक माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांची मने दुखावली आहेत. त्यामुळे आजवर दिलेल्या अनेक यातनांमुळे भाजपाचे काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी हे प्रचंड नाराज आहेत आणि त्यातूनच त्यांच्या उमेदवारीला विरोध होत आहे. मात्र, हा विरोध केवळ जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघापुरताच असून अन्य विभागांमधील भाजपाचे पदाधिकारी युतीधर्म म्हणून काम करण्यास तयार असल्याचे बोलले जात आहे. २०१४ मध्ये स्वतंत्र निवडणूक लढवल्यानंतरही जोगेश्वरी विधानसभेत वायकर यांना ७२,७६७ हजार मतदान झाले होते, तर भाजपाच्या उज्ज्वला मोडक यांना ४३,८०५ हजार मतदान झाले होते. (North West Lok Sabha Constituency)

(हेही वाचा – Loksabha Election 2024 : मतदानावेळी ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरले जाणार ‘हे’ 12 पुरावे)

वायकर हे कायमच भाजपाच्या विरोधात

दुसरीकडे अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांच्या नावाला भाजपाने पहिली पसंती दर्शवली आहे. शरद पोंक्षे हे कट्टर हिंदुत्वनिष्ठ असून सावरकरप्रेमी आहेत. ते पूर्वी शिवसेनेतही होते त्यामुळे शिवसैनिकांना परिचित आहेत. शिवाय भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पहिली पसंती ही पोंक्षे यांच्या नावाला आहे. त्यामुळे विभागातील भाजपाचा पदाधिकारी व कार्यकर्ता त्यांच्यासाठी जीवाचे रान करेल असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, वायकर हे कायमच भाजपच्या विरोधात वागत असून लोकप्रतिनिधींना डावलून मनमानी कारभार करण्याचा प्रयत्न केल्याने ही नाराजी त्यांच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे, असेही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (North West Lok Sabha Constituency)

वायकर हे स्वत: आमदार असले तरी…

उत्तर पश्चिम मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व आणि गोरेगाव हे सहा विधानसभा क्षेत्र येत असून त्यातील तीन भाजपाकडे तर उबाठा शिवसेनेचे दोन आणि शिवसेनेचा एक अशाप्रकारे मतदारसंघ आहेत. त्यामुळे जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे वायकर हे स्वत: आमदार असले तरी दिंडोशी, अंधेरी पूर्व व गोरेगाव या तीन विधानसभा क्षेत्रांमध्ये त्यांचे चांगले नाव आहे. शिवाय वायकर हे मंत्री राहिलेले असल्याने तसेच चार वेळा महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले असल्याने अंधेरी पश्चिम, वर्सोवा या मतदारसंघातही त्यांचे चांगले नाव आहे. मात्र, शिवसेनेने वायकर यांना निवडणूक रिंगणात उतरवल्यास युतीधर्म म्हणून काम करावे लागेल, शेवटी ‘अब की बार, ४०० पार’ असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिलेला आहे. त्यामुळे हे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही युतीचा उमेदवार म्हणून विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असेही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (North West Lok Sabha Constituency)

(हेही वाचा – Narayan Rane : उद्धव ठाकरे, राहुल गांधींना मतदारच तडीपार करतील; नारायण राणेंचा घणाघात)

रविंद्र वायकर यांची जमेची बाजू
  • नगरसेवक ते आमदार आणि मंत्री पद भुषवले.
  • चार वेळा स्थायी समिती अध्यक्ष.
  • जोगेश्वरी पूर्व विधानसभेत तीन वेळा आमदार.
  • जोगेश्वरीत कार्यसम्राट आमदार म्हणून ओळख.
वायकर यांची कमकुवत बाजू
  • जोगेश्वरी विधानसभेत त्यांनी भाजपाला होऊ दिले नाही मोठे.
  • आमदार असताना भाजपाच्या अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवकांना दिला त्रास.
  • विधानसभेत भाजपा नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये दादागिरी, मनमानी कारभार.
  • वायकर यांच्या विरोधात भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
शरद पोंक्षे यांची जमेची बाजू
  • शिवसेनेत यापूर्वी असल्याने शिवसैनिकांना परिचित.
  • कट्टर हिंदुत्व निष्ठ आणि सावरकरप्रेमी म्हणून ओळख.
  • अभिनेते असल्याने जनमानसांत चांगली प्रतिमा.
  • भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते त्यांना स्वीकारण्यास तयार.
कमकुवत बाजू
  • आतापर्यंत लोकांमध्ये मिसळून त्यांनी काम केलेले नाही.
  • कधीही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले नाहीत. (North West Lok Sabha Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.