
-
प्रतिनिधी
राज्याच्या विकासाच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. पुढील दोन दशकांचा विचार करून सरकारने एक व्यापक दिशा ठरवण्याचे काम हाती घेतले आहे. या दिशेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सोमवारी एक महत्त्वाची घोषणा करत राजकारणात व समाजात नवे वारे वाहतील, अशी खात्री दिली.
(हेही वाचा – Karnataka मध्ये मुस्लिमांनी केली गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक)
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले. बैठकीत पाणी, वीज, शिक्षण, उद्योग, सेवा, तंत्रज्ञान, अर्थकारण, सामाजिक कल्याण अशा अनेक विषयांवर चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी यावेळी उत्तम प्रशासन, सायबर सुरक्षा, भारत नेट रिंग, सहकार क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्राची गुणवत्ता यावर विशेष भर देण्याचे निर्देश दिले.
(हेही वाचा – The Bengal Files : चित्रपट प्रदर्शित न करणाऱ्या थिएटरवर कठोर कारवाई करा; FWICE चे सरकारला आवाहन)
“आपल्या ध्येयांची दिशा स्पष्ट असली पाहिजे. हे केवळ कागदोपत्री सादरीकरण राहणार नाही. २०४७ मध्ये विकसित महाराष्ट्राचे स्वप्न आपण नक्की पूर्ण करू,” असा ठाम विश्वास मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मोठी स्वप्ने ठेवल्याशिवाय प्रगती शक्य नसते, असे सांगत या आराखड्यामुळे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा लाभ पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला. शेवटी बैठकीत एकच निर्धार झाला – ‘विकसित महाराष्ट्र व्हिजन २०४७’ ही योजना केवळ कागदावर नाही, तर प्रत्यक्षात कार्यान्वित होऊन राज्याच्या आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक प्रगतीचा वेग अनेक पटींनी वाढवेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
