Karnataka मध्ये मुस्लिमांनी केली गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक

290

कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात (Karnataka Mandya District) गणेश विसर्जन मिरवणुकीवर मुस्लिम  समुदायाकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. हा प्रकार मंड्या जिल्ह्यातील माड्डूर शहरात (Maddur) घडला असून, यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दगडफेकीमध्ये (Stone Pelting) ८ जण जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तातडीने कठोर पाऊले उचलली असून, आतापर्यंत 21 जणांना अटक करण्यात आली आहे. (Karnataka)

(हेही वाचा – Elocution Competition : सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार राज्यस्तरीय महाविद्यालयीन पंडितराव वक्तृत्व स्पर्धा)

नक्की काय घडले?
माड्डूर शहरातील राम रहीम नगरमधून (Ram Rahim Nagar) गणेश विसर्जन मिरवणूक जात असताना ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम रहीम नगरमधील मशिदीसमोरून मिरवणूक जात असताना दगडफेक करण्यात आली. यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि पाहता पाहता त्याचे रूपांतर दगडफेकीत झाले. या अचानक झालेल्या दगडफेकीमुळे मिरवणुकीत गोंधळ उडाला आणि गणेशभक्तांची पळापळ झाली.

तात्काळ कारवाई आणि कलम १४४
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कडक पाऊले उचलली. पुढील अनुचित घटना टाळण्यासाठी संपूर्ण माड्डूर शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे, ज्यामुळे चार किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र जमण्यास मनाई आहे. पोलीस अधीक्षक स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

राजकीय प्रतिक्रिया आणि सलोख्याचे आवाह
भाजपच्या नेत्यांनीही या घटनेचा निषेध करत, राज्याच्या काँग्रेस सरकारवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. पोलीस प्रशासनाने दोन्ही समुदायांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

(हेही वाचा – ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शिका!’ ‘या’ कौशल्यामुळे Israel’s PM Netanyahu प्रभावित )

एक वर्षापूर्वीही हिंसाचार झाला होता
24 ऑगस्ट 2024 रोजीही मंड्या येथे हिंसाचार झाला. नागमंगला येथील गणपती विसर्जन मिरवणूकीवर दगडफेक करण्यात आली. म्हैसूर रोडवरील दर्ग्यासमोर पोहोचताच काही लोकांनी दगडफेक केली. परिसरातील काही दुकाने आणि तिथे उभ्या असलेल्या वाहनांना आग लावण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. कन्नड वृत्तवाहिन्यांनुसार, दगडांव्यतिरिक्त, मिरवणुकीवर तलवारी, रॉड आणि ज्यूसच्या बाटल्यांनी हल्ला करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेत 15 पोलिसही जखमी झाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.