Movie Theater Fireworks : चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान सिनेमागृहातच चाहत्यांनी फोडले फटाके

116
Movie Theater Fireworks : चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान सिनेमागृहातच चाहत्यांनी फोडले फटाके

राज्यात एकीकडे फटाक्यांमुळे ठिकठिकाणी आग लागल्याच्या घटना घडत असतांना दुसरीकडे मात्र थेट चित्रपटगृहातच फटाके फोडले (Movie Theater Fireworks) गेले आहेत.

अधिक माहितीनुसार, अभिनेता सलमान खान याच्या ‘टायगर ३’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान त्याच्या काही अतिउत्साही चाहत्यांनी थेट थिएटरमध्येच फटाके (Movie Theater Fireworks) फोडले आहेत. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे.

(हेही वाचा – Chhatrapati Sambhaji nagar : फटाक्यांमुळे १० ठिकाणी आगीच्या घटना, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही)

काल म्हणजेच रविवार १२ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव (Movie Theater Fireworks) येथील मोहन चित्रपटगृहात ही घटना गाडली.

जवळपास एक मिनिटाहून अधिक काळ हे फटाके फुटत (Movie Theater Fireworks) होते. त्यामुळे नाट्यगृहाच्या आत बसलेल्या प्रेक्षकांची तारांबळ उडाली. ते सुरक्षित जागेवर जाण्यासाठी धावाधाव करू लागले.

(हेही वाचा – Ind vs Ned : विराटच्या पहिल्या विश्वचषक बळीनंतर अनुष्का शर्माची भन्नाट प्रतिक्रिया )

केवळ मालेगावमध्येच (Movie Theater Fireworks) नाही तर देशभरातील इतर अनेक चित्रपटगृहांमध्येही सलमान खानच्या चाहत्यांनी फटाके फोडले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.