Chhatrapati Sambhaji nagar : फटाक्यांमुळे १० ठिकाणी आगीच्या घटना, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

86
Chhatrapati Sambhaji nagar : फटाक्यांमुळे १० ठिकाणी आगीच्या घटना, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
Chhatrapati Sambhaji nagar : फटाक्यांमुळे १० ठिकाणी आगीच्या घटना, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

रविवारी (१२ नोव्हेंबर) रोजी देशभरात लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. मात्र दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर शहरात वेगवेगळ्या आगीच्या (Fire) घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनांमध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान, आगीच्या घटनेत १५ लाखांचे नुकसान झाले आहे. तर, काही फायर कॉलनंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याचे पाहायला मिळाले. (Chhatrapati Sambhaji nagar)

रात्री दहाच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध ठिकाणी आग लागल्याच्या तब्बल दहा घटना घडल्या. या सर्व आगीच्या घटना किरकोळ असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन अग्निशमन विभागाला त्याबाबत सूचना दिल्याने सुदैवाने मोठी हानी टळली. या घटनांमध्ये कोणालाही दुखापत झालेली नसल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.

(हेही वाचा : Government Recruitment : शासकीय कंत्राटी भरतीमध्ये आता दिव्यांगांसाठी आरक्षित जागा)

पहिल्या दिवशी दहा घटनांमध्ये आगीमुळे १५ लाखांचे नुकसान
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात मोठ्या उत्साहात नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. मात्र, यामुळे काही ठिकाणी आगीच्या घटना देखील समोर आल्या आहेत. लक्ष्मीपूजनानिमित्त उडवल्या गेलेल्या फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी कचरा पेटल्याने आग लागल्याचे समोर आले. शहरात एकूण १० ठिकाणी आगीच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, या सर्व आगीच्या घटना किरकोळ असून यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. दिवाळीच्या पहिल्या दिवशी शहरात दहा घटनांमध्ये आगीमुळे १५ लाखांचे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कुठेही जीवितहानी झालेली नाही.

कोठे कोठे लागली आग?
शहरात लगलेल्या आगीच्या घटनांमध्ये दिवाण देवडी, उस्मानपुरा, सातारा परिसर नक्षत्र वाडी पानचक्की परिसर, चिकलठाणा परिसर या ठिकाणी आग लागली. नक्षत्र वाडीतील एका एका सोसायटीतील सहाव्या मजल्यावर आग लागली होती. यामध्ये संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. छत्रपतीनगरात अय्यप्पा मंदिरासमोरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये एका वर्गखोलीतून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याने नागरिकांनी अग्निशमन विभागाला कळविले. रॉकेट खोलीत घुसल्याने शैक्षणिक साहित्याला आग लागली. पण ती वेळीच नियंत्रणात आली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.