Maharashtra Drought : मंडळनिहाय दुष्काळ लवकरच घोषित होणार – देवेंद्र फडणवीस

133
Maharashtra Drought : मंडळनिहाय दुष्काळ लवकरच घोषित होणार - देवेंद्र फडणवीस

काही दिवसांपूर्वी राज्यातील दुष्काळ (Maharashtra Drought) स्थिती जाहीर केलेल्या ४० तालुक्यांच्या व्यतिरिक्त उर्वरीत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या महसुली मंडळातील दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार असल्याचे मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी जाहीर केले होते.

अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच मंडळनिहाय दुष्काळ (Maharashtra Drought) घोषित होणार असल्याचे सांगितले आहे.

(हेही वाचा – Air Pollution : मुंबईची हवेची गुणवत्ता खालावली, सकाळ पासून रात्री पर्यंत धामधुडूम सुरूच)

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“राज्यात अनेक भागात दुष्काळी (Maharashtra Drought) परिस्थिती आहे. मंत्रिमंडळ उपसमिती आता वेगवेगळ्या निकषांवर आधारित मंडळ स्तरावर जात आहे. लवकरच दुष्काळी मंडळांचीही घोषणा होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. केंद्राच्या निकषानुसार, राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. यावरून झालेल्या टीकेनंतर मंत्रिमंडळ बैठकीत ९०० मंडळनिहाय दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.”

याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कुलाबा येथील पालावारची दिवाळी’ या कार्यक्रमावेळी पत्रकारांशी (Maharashtra Drought) बोलताना माहिती दिली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.

(हेही वाचा – Government Recruitment : शासकीय कंत्राटी भरतीमध्ये आता दिव्यांगांसाठी आरक्षित जागा)

१७८ तालुक्यातील ९५९ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती म्हणून जाहीर

अकोला जिल्ह्यातील ७ तालुक्यामधील ५० मंडळ, अमरावती जिल्ह्यातील १३ तालुक्यामधील ७३ मंडळ, बुलढाणा जिल्ह्यातील ११ तालुक्यामधील ७० मंडळ, वाशीम जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ३१ मंडळ, यवतमाळ जिल्ह्यातील ५ तालुक्यामधील ९ मंडळ, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७ तालुक्यामधील ५० मंडळ, बीड जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ५२ मंडळ, हिंगोली जिल्ह्यातील ५ तालुक्यातील १३ मंडळ, जालना जिल्ह्यातील ३ तालुक्यामधील १७ मंडळ, लातूर जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ४५ मंडळ, नांदेड जिल्ह्यातील ८ तालुक्यातील २३ मंडळ, धाराशीव जिल्ह्यातील ५ तालुक्यातील २८ मंडळ, परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ३८ मंडळ, नागपूर जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ५ मंडळ, वर्धा जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ६ मंडळ, अहमदनगर जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ९६ मंडळ, धुळे जिल्ह्यातील ३ तालुक्यातील २८ मंडळ, जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७ मंडळ, नंदुरबार जिल्ह्यातील ३ तालुक्यातील १३ मंडळ, नाशिक जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ४६ मंडळ, कोल्हापूर जिल्ह्यातील ५ तालुक्यातील २० मंडळ, पुणे जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ३१ मंडळ, सांगली जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ३७ मंडळ, सातारा जिल्ह्यातील ८ तालुक्यामधील ६५ मंडळ, सोलापूर जिल्ह्यातील ७ तालुक्यामधील ४६ मंडळ असे एकूण १७८ तालुक्यातील ९५९ मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. (Maharashtra Drought)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.