Fire : पिंपरी-चिंचवड शहरात 100 पेक्षा जास्त दुकानांना आग

151

पिंपरी-चिंचवड शहरातील जाधववाडी वडाचा मळा परिसरातील मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास भंगाराच्या गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत (Fire) १५० ते २०० दुकाने जळून खाक झाली.

(हेही वाचा Congress : काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे ‘इस्लामिक स्टेट’ची पायाभरणी; मुसलमानांना अमर्याद स्वातंत्र्य आणि शरिया कायद्याचे अप्रत्यक्ष स्वागत)

या परिसरात मोठ्या प्रमाणावर भंगाराची दुकाने आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरालिका आणि अन्य इतर संस्थांच्या अग्निशमन दलाच्या मदतीने जवळपास ६० पेक्षा अधिक वाहनांच्या मदतीने ही आग (Fire) आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. सध्या आग नियंत्रणात असून यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र दुकानाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशी ही माहिती समोर येते की, हे गोडाऊन अनधिकृत होते. या संदर्भात कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. धक्कादायक बाब म्हणजे या पालिकेच्या सेफ्टी सर्वेक्षणात या गोडाऊनची नोंद झाली होती का? याबाबत त्यांना काही सूचना देण्यात आल्या होत्या, असा सवालही आता उपस्थित होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील अशा अनेक अनधिकृतपणे चालवण्यात येणाऱ्या गोडाऊनमध्ये आग लागण्याचे प्रमाण वाढले. पालिका प्रशासन आता तरी ठोस पावले उचलणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Fire)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.