Sangli मध्ये काँग्रेस बंडखोरीच्या तयारीत?

सांगलीचा झाला कुस्तीचा आखाडा, काँग्रेस आणि शिवसेना उबाठा यांच्यात एका ‘पैलवाना’च्या उमेदवारीवरून सुरू झालेली ‘कुस्ती’ लवकर संपण्याची चिन्हे नाहीत.

137
Sangli मध्ये काँग्रेस बंडखोरीच्या तयारीत?

महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना उबाठाने सांगली लोकसभा मतदार संघाचा अक्षरशः कुस्तीचा ‘आखाडा’ केला असून एका ‘पैलवाना’साठी दोन्ही पक्षात सुरू झालेली कुस्ती लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. (Sangli)

लोकसभेच्याच मार्गावर ठाम

काँग्रेसचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते सांगली लोकसभा मतदार संघावरील दावा सोडण्याच्या मनस्थितीत नाहीत तर शिवसेना उबाठादेखील माघार घेईल असे चित्र नाही. शिवसेना उबाठाने विशाल पाटील यांना राज्यसभेच्या मार्गाने दिल्ली गाठण्याचा पर्याय सुचवला, मात्र काँग्रेस लोकसभेच्याच मार्गावर ठाम आहे. अखेर शेवटचा पर्याय म्हणून स्थानिक काँग्रेस बंडाच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (Sangli)

(हेही वाचा – Congress : काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे ‘इस्लामिक स्टेट’ची पायाभरणी; मुसलमानांना अमर्याद स्वातंत्र्य आणि शरिया कायद्याचे अप्रत्यक्ष स्वागत)

काँग्रेस हायकमांडची उबाठाविरोधात जाण्याची हिम्मत नाही

महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट सांगली गाठत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी एका जाहीर कार्यक्रमातून घोषित केली. यामुळे काँग्रेसमध्ये या मनमानी प्रकाराबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला गेला. स्थानक काँग्रेस नेते, आमदार आणि विशाल पाटील यांचे समर्थक विश्वजीत कदम यांनी दिल्ली गाठली. हायकमांडकडे आपले गाऱ्हाणे मांडले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यांचे प्रयत्न आजही सुरू असून काँग्रेस हायकमांडची उबाठाविरोधात जाण्याची हिम्मत दाखवत नाही. (Sangli)

वंचितचा फटका विशाल पाटलांना

४३-वर्षीय विशाल पाटील हे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू असून सांगली हा काँग्रेसचा परंपरागत गड मानला जातो. गेल्या दोन लोकसभा निवडणुका वगळता, महाराष्ट्र राज्याची स्थापना (१९६०) झाल्यानंतर म्हणजेच १९६२ पासून २००९ पर्यंत झालेल्या सर्व लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारत या मतदार संघाचे नेतृत्व केले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत तेव्हाच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत ही जागा मित्रपक्ष राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला गेली होती आणि स्वाभिमानी पक्षातर्फे विशाल पाटील यांनी निवडणूक लढवली. तेव्हा त्यांना ३.४४ लाख मते मिळाली. मात्र भाजपाचे संजयकाका पाटील यांनी ५.९ लाख मते घेत पाटील यांचा १.६४ लाख मतांनी पराभव केला. तर वंचित बहुजन आघाडीचे तत्कालीन उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी ३ लाखाहून अधिक मते पदरात पाडून घेतली, ज्याचा फटका विशाल पाटलांना बसला. (Sangli)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : फायरब्रॅंड नेत्यांना राजकीय पक्षांचा ‘खो’)

तडजोडीच्या मनस्थितीत नाही

यावेळी मात्र काँग्रेस कोणतीही तडजोड करण्याच्या मनस्थितीत नाही. तसेच वेळ पडल्यास बंडखोरी करून विशाल पाटील यांना अपक्ष म्हणून तरी निवडणूक रिंगणात उतरविण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. (Sangli)

मतदारांना भावनिक साद

आज शनिवारी विशाल पाटील यांनीही आपला सांगलीतील मतदारांना साद घालत एक भावनिक पत्र ‘X’ या समाजमाध्यमावर पोस्ट केले आहे. “सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणही सर्वजण लढण्यासाठी सज्ज झालो आहोत. मला काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय. शिवाय सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने सांगली काँग्रेसचीच या भूमिकेवर ठाम आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने मा. विश्वजित कदम साहेब सर्व प्रयत्न करत आहेत. सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार आहे. तुम्ही सर्वांनी सांगलीच्या प्रगतीसाठी आतापर्यंत दाखवलेला संयम असाच आणखी काही दिवस ठेवा. सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल याची मला खात्री आहे. आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने केवळ लढवायचा नाही, तर जिंकायचा आहे. आपण लढू आणि जिंकू…” असे या पत्रात म्हटले आहे. (Sangli)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.