Lok Sabha Election 2024 : फायरब्रॅंड नेत्यांना राजकीय पक्षांचा ‘खो’

भाजपा आणि कॉंग्रेससह तमाम राजकीय पक्षांनी त्यांच्या पक्षातील तथाकथित नेत्यांना केवळ निवडणुकीच्या प्रचारापासून लांब ठेवलं असं नाही तर त्यांना निवडणुकीच्या मैदानातच येऊ दिलं नाही. यातील कितीतरी जणांची नावे स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आली आहे आणि कितीतरी जणांना तिकीट नाकारण्यात आलं आहे.

131
Lok Sabha Election 2024 : ... तरीही काही राजकीय पक्षांचे जाहीरनामे प्रतिक्षेत
  • वंदना बर्वे

माझ्यासारखा दुसरा फायरब्रॅंड नेता नाही अशा तोऱ्याच वागण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांच्या हातात राजकीय पक्षांनी धुपाटणं दिलं असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षासह देशातील तमाम राजकीय पक्षांनी त्यांच्या पक्षातील तथाकथित ‘फायरब्रॅंड’ नेत्यांना लोकसभेच्या निवडणुकीत ‘फायर’ केलं आहे. १८ व्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेससह अन्य राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सभा सुरू झाल्या आहेत. कॉंग्रेसचा जाहीरनामा सुध्दा प्रसिध्द झाला आहे. (Lok Sabha Election 2024)

यानंतरही लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काही तरी चुकल्यासारखं वाटत आहे. नेमकं काय सुटलं आहे याचा आढावा घेतल्यानंतर असं लक्षात आलं की, मागील एक दोन वर्षांत जी मंडळी खूप चर्चेत होती ती लोकसभेच्या या निवडणुकीत कुठेच दिसून येत नाही. भाजपा आणि कॉंग्रेससह तमाम राजकीय पक्षांनी त्यांच्या पक्षातील तथाकथित नेत्यांना केवळ निवडणुकीच्या प्रचारापासून लांब ठेवलं असं नाही तर त्यांना निवडणुकीच्या मैदानातच येऊ दिलं नाही. यातील कितीतरी जणांची नावे स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आली आहे आणि कितीतरी जणांना तिकीट नाकारण्यात आलं आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – CBI : दिल्लीत नवजात बालकांच्या तस्करीप्रकरणी सीबीआयची छापेमारी, ८ बालकांची सुटका)

भाजपा आणि कॉंग्रेसमधील काही नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या गुडबुकमध्ये यावसं वाटत होतं. आपण गुडबुकमध्ये किंवा हायकमांडची आपल्यावर नजर पडली तर लोकसभेच्या निवडणुकीतील आपलं तिकीट पक्कं, असं त्यांना वाटत होतं. म्हणून हायकमांडला खुश करण्यासाठी वाट्टेल तेव्हा विरोधी पक्षातील नेत्यांच्या विरोधात उलटसुलट विधानं करण्याची मोहिम या नेत्यांनी हाती घेतली होती. मात्र, आपला अति उत्साहीपणा आपल्याच अंगाशी येईल, याची कल्पनासुध्दा त्यांनी केली नसेल. (Lok Sabha Election 2024)

वाचाळवीर बनण्याचा प्रयत्न आता या नेत्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. राजकीय पक्षांनी वादग्रस्त विधाने करून प्रसिद्धी मिळविणाऱ्या नेत्यांना निवडणुकीत फारसे महत्त्व दिले नाही. अशा नेत्यांना ना तिकीट दिले गेले ना स्टार प्रचारक म्हणून पद. यात प्रज्ञा ठाकूर, वरुण गांधी यांच्यासह भाजपा, काँग्रेस, सपा, राजद अशा विविध पक्षांचा समावेश आहे. महत्वाचा मुद्या म्हणजे, जेव्हा ही मंडळी कधीही जीभ उचलून टाळूला लावत होती तेव्हा हायकमांडने मौन बाळगले होते. यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळाले. पण जेव्हा काही देण्याची वेळ आली तेव्हा पक्षाने पाठ फिरवली. आता किमान डझनभर नेते घरी बसले आहेत. यात सपाचे स्वामी प्रसाद मौर्य, राजदचे प्रा. चंद्रशेखर आणि भाजपच्या प्रज्ञा ठाकूरसारखे नेते घरी विश्राम करीत आहेत. स्वामी प्रसाद मौर्य खूप बोलले. त्यावर प्रतिक्रियाही उमटल्या. हायकमांडच्या मौनामुळे त्यांचे मनोधैर्य वाढले. पण निवडणुका जवळ आल्याने सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी भाव देणे बंद केले. जेव्हा त्यांची विधाने वैयक्तिक मते मानली जाऊ लागली तेव्हा त्यांना पक्ष सोडण्यास भाग पाडले गेले. आता त्यांना वेगळा पक्ष काढावा लागला आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Shrikant Shinde: कल्याणच्या जागेवरून मोठमोठ्या वल्गना करणारे ठाकरे कुठे आहेत? श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल)

इंडी आघाडीकडून तिकिटासाठी विनंती

हिंदू धर्माला धर्म न मानता केवळ एक फसवणूक म्हणणाऱ्या स्वामींना आता एका जागेसाठी इंडी आघाडीची मनधरणी करावी लागत आहे. त्यांची मुलगी आणि बदाऊहून भाजपा खासदार संघमित्रा मौर्य यांनाही त्यांच्या वाईट शब्दांचा फटका सहन करावा लागला. हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजपाच्या उमेदवार कंगना रणौत यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनाही फटका बसला आहे. त्यांनी महाराजगंजमधून तिकीट मागितले होते. परंतु, काँग्रेसने स्पष्ट नकार दिला. (Lok Sabha Election 2024)

भाजपानेही अंतर ठेवले

भाजपानेही आपल्या अनेक विधानवीरांना विश्रांती दिली आहे. आपल्या कामासाठी नव्हे, तर विधानांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अनेक खासदारांपासून पक्षाने स्वत:ला लांब ठेवले आहे. बिहारचे मुझफ्फरपूरचे खासदार अजय निषाद काय काय बोलत होते हे सर्व पक्षाने लक्षात ठेवले आणि ऐन तिकीट देण्याच्यावेळेस हिशेब चुकता केला. कोरोनाच्या वेळी अजयने देशातील सर्व मुस्लिमांना दहशतवादी म्हटले होते. हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचले होते. (Lok Sabha Election 2024)

उत्तर प्रदेशातील पिलीभीतमधून वरूण गांधी यांचे तिकीट कापण्यामागेही हेच कारण आहे. भोपाळच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांचाही पुनर्विचार झाला नाही. नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणे अंगावर आले. दक्षिण दिल्लीचे भाजपा खासदार रमेश बिधुडी सुध्दा जीभेचे बळी ठरले. संसदेतच त्यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याने बराच गदारोळ झाला होता. त्याचा परिणाम आता झाला आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Fastest Balls in IPL : आयपीएलच्या सर्वात वेगवान गोलंदाजांच्या शर्यतीत मयंक यादवची दमदार एंट्री )

प्रवेश वर्मा यांचे तिकीट कापले

दिल्लीतील आणखी एक खासदार प्रवेश वर्मा यांनाही त्यांच्या वक्तव्यामुळे तिकीट नाकारण्यात आले. अडीच वर्षांपूर्वी त्यांनी एका समुदायावर वादग्रस्त विधान केले होते. भाजपाचे कर्नाटकचे खासदार अनंत हेगडे यांनाही फटका बसला आहे. संविधान बदलण्यासाठी चारशे जागा हव्या असल्याचे विधाण त्यांना एवढे महाग पडले की सहा वेळा खासदार म्हणून निवडून आल्यानंतरही भाजपने तिकीट कापले. (Lok Sabha Election 2024)

‘रामचरित मानस’वर बेताल विधाने

बिहारमधील महाआघाडी सरकारमध्ये आरजेडी कोट्यातून मंत्री असलेले प्रा. चंद्रशेखर. मंत्री असताना त्यांनी रामचरित मानस आणि तुलसीदासांवर बेताल वक्तव्य केले. प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिध्दी मिळू लागल्यामुळे हवा डोक्यात गेली. यादरम्यान आरजेडी प्रमुख लालू प्रसाद आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव काहीही बोलले नाहीत. मात्र, लालू धार्मिक विधींच्या माध्यमातून संकेत देत राहिले. चंद्रशेखर यांनी समजण्यात चूक केली. (Lok Sabha Election 2024)

फतेह बहादूर हे राजदचे दुसरे आमदार आहेत. दोन महिन्यांपूर्वीपर्यंत ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे माध्यमांमध्ये चर्चेत होते. कुशवाह मतदार निर्णायक असलेल्या मतदारसंघातून तिकीट मागितले. पण जेव्हा तिकीट देण्याची वेळ आली तेव्हा लालू प्रसाद यादव यांनी दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना औरंगाबाद आणि नवादामधून तिकीट दिले. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.