Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य, विज्ञान, समाजसेवा, स्मृतीचिन्ह पुरस्कार जाहीर

186
Veer Savarkar: स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य, विज्ञान, समाजसेवा, स्मृतीचिन्ह पुरस्कार जाहीर

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. वीर सावरकर यांच्या आदर्श विचारांना अनुसरून स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तीला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य’ आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते.

शौर्य पुरस्काराची सुरुवात १९८९ मध्ये परमवीर चक्र विजेते भारतीय सैन्यातील नायब सुभेदार बाणा सिंग यांना सन्मानित करून करण्यात आली. २००५ मध्ये दीप्ती देवबागकर यांना पहिला स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार कालातीत आणि तितकेच प्रभावी आहेत. या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या व्यक्तीला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४१व्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak)

(हेही वाचा – Milind Deora: उद्धव ठाकरेंमुळे मला पक्ष सोडावा लागला, मिलिंद देवरा यांनी असा आरोप का केला? )

‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार -२०२४’ कर्नल सचिन अण्णाराव निंबाळकर यांना घोषित झाला असून मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि १ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार – २०२४’ भारतीय राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमी (आय. एन. ए.)चे डॉ. सुहास जोशी यांना घोषित झाला असून मानपत्र, स्मृतिचिन्ह, रू. ५१,००० असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्याचप्रमाणे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विशेष पुरस्कार – २०२४’ अभिनेता रणदीप हुड्डा यांना घोषित झाला असून मानपत्र, स्मृतिचिन्ह, आणि रुपये ५१,००० असे पुरस्काराचे स्वरूप आहे. वीर सावरकरांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या व्यक्ती वा संस्थेसाठी दिला जाणारा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीचिन्ह पुरस्कार – २०२४’ हा यावेळी विद्याधर जयराम नारगोळकर यांना घोषित झाला आहे. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि रू. २५,००० असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. (Veer Savarkar)

याआधी सन्मानित करण्यात आलेले मान्यवर
साधना पवार (अशोकचक्र), नीला सावंत, ले. कर्नल शांतीस्वरूप राणा (अशोकचक्र) मरणोत्तर, कॅप्टन विक्रम बत्रा (परमवीर चक्र) मरणोत्तर, वीरबाहू हुतात्मा तुकाराम गोपाळ ओंबळे आदींना स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. विजय पी. भटकर, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. वसंत गोवारीकर या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांना स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. डॉ. विजय पी. भटकर, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. वसंत गोवारीकर या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांना स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सावरकर चरित्राचे लेखक मामाराव दाते, पुण्याचे महापौर गणपतराव एम. नलावडे, मेजर प्रभाकर बी. कुलकर्णी, प्रख्यात दिग्दर्शक प्रेम वैद्य, लेखक व राजकारणी वासुदेव नारायण उत्पात, लेखक व दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर व इतर मान्यवरांना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १४१व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम

  • रविवार, २६ मे रोजी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार – २०२४’ सोहळा सायंकाळी ७ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर उपस्थित राहणार आहेत.
  • शनिवार, २५ आणि रविवारी, २६ मे रोजी ‘गाथा शिवशौर्याची’ या विषयातंर्गत शिवाकालीन दुर्मिळ नाणी, भारतीय आणि परदेशी नोट/नाणी आणि वस्तू तसेच गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, तळमजला येथे आयोजन करण्यात आले आहे.
  • गुरुवारी, २३ मे ते रविवारी, २६ मेपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, पहिला मजला येथे ‘शिवसंस्कार’ हे शिवचरित्रावर आधारित चित्रकाव्यांचे भव्य कलादालन तयार करण्यात आले आहे.
  • रविवारी, २६ मे रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजता मादाम कामा सभागृह येथे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे.
  • सईशा प्रोडक्शन्स, मुंबई निर्मित आणि प्रस्तुत ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’ या ४२ नवगीतांमधून साकारलेल्या संगीतमय शिवचरित्राचा आनंद रसिकांना घेता येईल. स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात सकाळी १० वाजता याचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.