Open AI : हॉलिवूड अभिनेत्री स्कार्लेट जोहानसनचा ओपन एआयवर आवाज चोरल्याचा आरोप

Open AI : ओपन एआयने तो आवाज मागे घेतला असला तरी जोहानसनच्या आरोपात तथ्य नसल्याचं म्हटलंय.

180
Open AI : हॉलिवूड अभिनेत्री स्कार्लेट जोहानसनचा ओपन एआयवर आवाज चोरल्याचा आरोप
  • ऋजुता लुकतुके

चॅट जीपीटीच्या स्काय यंत्रणेत वापरलेला आवाज हा आपला असल्याचा दावा हॉलिवूड अभिनेत्री स्कार्लेट जोहानसनने केला आहे. पण, सॅम ऑल्टमन यांच्या ओपन एआय कंपनीने हा आवाज काढून घेतला असला तरी तो जोहानसनचा नसून एका व्यावसायित अभिनेत्रीचा आहे, असं स्पष्ट केलं आहे. (Open AI)

‘सप्टेंबर २०२३ मध्ये ऑल्टमन यांनी चॅटजीपीटीसाठी आवाज देण्याची विनंती मला केली होती. ती व्यावसायिक ऑफऱ मी धुडकावली. तरीही ऑल्टमन यांनी माझ्या आवाजाशी मिळता जुळता आवाज स्कायमध्ये वापरला आहे. माझे कुटुंबीयं आणि जवळचे मित्र हा आवाज ऐकून एकदम अचंबित झाले,’ असं जोहानसन यांनी आपल्या अधिकृत पत्रकात म्हटलं आहे. (Open AI)

(हेही वाचा – Coastal Road वर ठिकठिकाणी अग्निशमन केंद्रांची निर्मिती! लवकरच सुरू होणार ठाकूर व्हीलेज केंद्र)

ओपन एआय कंपनीने केलं हे जाहीर 

यावर सॅम ऑल्टमन यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. आवाज जोहानसनचा नाही आणि तिच्या आवाजाची नक्कल करण्याचा प्रयत्नही नाही, असं ओपन एआय कंपनीने म्हटलं आहे. ‘आवाजासाठी जोहानसन यांना संपर्क केला त्यापूर्वीपासून ही व्हॉईस ओव्हर कलाकार आमच्यासाठी काम करत होती. आताही आम्ही जोहानसन यांची नक्कल केलेली नाही. पण, त्यांच्या भावनांचा मान राखत आम्ही स्कायचा आवाज बदलत आहोत,’ असं ओपन एआय कंपनीने जाहीर केलं आहे. (Open AI)

ट्विटरवर मात्र या प्रकरणाची भरपूर चर्चा रंगली आहे. एका व्यक्तीने या नाट्याविषयी लिहिलंय, ‘सॅम ऑल्टमनची गेल्यावर्षी हकालपट्टी का झाली ते आता कळलं.’ तर आणखी एका व्यक्तीने प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, ‘जोहानसनने गेल्यावर्षी डिस्नीसाठी आवाज दिली नाही. तर स्कायसाठी ती का देईल?’ (Open AI)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.