RBI MPC Highlights : युपीआयने बँकेत पैसे कसे जमा करायचे?

RBI MPC Highlights : रिझर्व्ह बँकेनं पतधोरण जाहीर करताना डेबिट कार्ड शिवाय आणि बँकेच्या शाखेतही न जाता पैसे जमा करण्याच्या सुविधेविषयी सुतोवाच केलं आहे.

149
RBI MPC Highlights : युपीआयने बँकेत पैसे कसे जमा करायचे?
  • ऋजुता लुकतुके

शुक्रवारी तिमाही पतधोरण जाहीर करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी युपीआयद्वारे बँकेत पैसे जमा करण्याच्या सुविधेचा उल्लेख केला. ही सुविधा सुरू करण्यावर मध्यवर्ती बँक काम करत असल्याचं दास यांनी सांगितलं. आणि तसं झालं तर आपल्याला पैसे काढणे, बँकेत पैसे भरणे यासाठी बँक शाखेत जावंच लागणार नाही. आपल्या हातातील मोबाईलच्या माध्यमातून आपण बरेच व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करू शकतो. बँकेत जाण्याची आता बऱ्याचदा गरज भासत नाही. यूपीआयच्या (UPI) सुविधेमुळे तर पैशांचे व्यवहार फारच सोपे झाले आहेत. दरम्यान, याच यूपीआयच्या मदतीने आता बँकेत न जाता तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे टाकता येणार आहेत. (RBI MPC Highlights)

बँकेत किंवा एटीएमच्या बाजूलाच आता सीडीएम (कॅश डिपॉझिट मशीन) उपलब्ध आहेत. या सीडीएमद्वारे आपण प्रत्यक्ष बँकेत न जाताही आपल्या खात्यात पैसे टाकू शकतो. त्यासाठी आपल्याकडे डेबिट कार्ड असणे गरजेचे असते. आता मात्र सोबत डेबिट कार्ड नसले तरीही सीडीएमच्या माध्यमातून बँक खात्यात पैसे जमा करता येणार आहेत. (RBI MPC Highlights)

(हेही वाचा – Kaizen Institute: मंत्रालयीन अधिकारी-कर्मचारी यांना कायझेनचे प्रशिक्षण)

आगामी काळात ‘ही’ सुविधा कार्यान्वित केली जाणार

देशात ठिकठिकणी एटीएम मशीन्स आल्यानंतर अगोदर डेबिट कार्डच्या माध्यमातूनच या मशीन्समधून रोख रक्कम काढता यायची. आता मात्र आपल्याकडे डेबिट कार्ड नसले तरी यूपीआय प्रणालीच्या माध्यमातून आपण एटीएममधून पैसे काढू शकतो. त्यासाठी आपल्याकडे फक्त आपला मोबाईल असणे गरजेचे आहे. अशीच काहीशी पद्धत आता आपल्या बँक खात्यात रोख रक्कम जमा करण्यासाठी लागू केली जाणार आहे. यूपीआय प्रणालीद्वारे आता डेबीट कार्ड नसले तरीही तुम्हाला बँक खात्यात पैसे जमा करता येणार आहेत. (RBI MPC Highlights)

यूपीआयद्वारे सीडीएममध्ये पैसे कसे जमा करायचे? याची निश्चित पद्धत समोर आलेली नाही. खरं म्हणेज ही सुविधा सध्या चालू नाहीये. पण आगामी काळात लवकरच ही सुविधा कार्यान्वित केली जाणार आहे. त्यानंतर सीडीएम मशीन्सवर यूपीआयचा ऑप्शन दिला जाणार आहे. आरबीआयने ही पद्धत लागू करण्यासाठी काम चालू केलेले असून लवकरच ते प्रत्यक्ष कार्यान्वित केले जाईल. (RBI MPC Highlights)

यूपीआयच्या मदतीने पैसे जमा करण्याची संभाव्य पद्धत जाणून घेऊ या…
  • आपला मोबाईल फोन घेऊन कॅश डिपॉझिट मशीनजवळ जा.
  • या मशीनच्या स्क्रीनवर असलेल्या यूपीआय कॅश डिपॉझिट ऑप्शनवर क्लीक करावे.
  • ज्या बँक खात्यात पैसे जमा करायचे आहेत, तो खाते क्रमांक टाकावा.
  • बँक खाते क्रमांक टाकल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला एक क्यूआर कोड दिसेल.
  • त्यानंतर तुमच्याजवळ असलेले यूपीआय अॅप उघडा आणि क्यूआर कोड स्कॅन करा.
  • सीडीएम मशीनमध्ये पैसे टाका आणि पैसे जमा करण्याची अनुमती द्या.
  • त्यानंतर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. तसा मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल.

दरम्यान, रिझर्व्ह बँकेनं युपीआयद्वारे बँकेत पैसे कसे जमा करावे, याबाबतच्या स्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत. अद्याप ही कार्यप्रणाली सुरू झालेली नाही. मात्र लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा आहे. (RBI MPC Highlights)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.