Maratha Kranti Morcha : महापालिकेचे तब्बल दीड कोटी रुपयांचे नुकसान

न वापरलेल्या शौचालयांसाठी मोजावे लागले कोट्यवधी रुपये

2382
Maratha Kranti Morcha : महापालिकेचे तब्बल दीड कोटी रुपयांचे नुकसान
Maratha Kranti Morcha : महापालिकेचे तब्बल दीड कोटी रुपयांचे नुकसान
विशेष प्रतिनिधी,मुंबई
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी उपोषण करण्याचा इशारा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. परंतु हा मोर्चा वाशीच्या शिवाजी चौकात अडवला गेला. परंतु हा मोर्चा काढण्यावर जरांगे पाटील हे ठाम असल्याने मुंबई महापलिकेने आझाद मैदानात जोरदार तयारी केली होती आणि यासाठी तब्बल सुमारे १ हजार सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था केली होती. परंतु या न वापरलेल्या शौचालयांसाठीच तब्बल दीड कोटी रुपयांचा खर्च झाला असल्याची माहिती मिळत आहे. (Maratha Kranti Morcha)
प्रसाधनगृहे आणि पाण्याच्या टँकरची व्यवस्था 
मराठा क्रांती मोर्चाचे (Maratha Kranti Morcha) नेतृत्व करणाऱ्या जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने कुच केल्यानंतर त्यांचा मोर्चा २४ जानेवारी रोजीच वाशी नाका येथे अडवला. प्रजासत्ताक दिनी मुंबईत येणारा हा मोर्चा  शनिवारी २७ जानेवारी रोजी काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हा मोर्चा तथा सभा आझाद मैदानात घेण्याचा निर्णय घेतल्यास महापालिकेला प्रसाधनगृहे आणि पाण्याच्या टँकरची व्यवस्था करावी लागणार होती, त्यादृष्टीकोनातून महापालिकेने प्रथम ही व्यवस्था केली होती.
तब्बल १ हजार सार्वजनिक फिरत्या शौचालयांची व्यवस्था 
त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षणाचा अध्यादेश निघाल्याने त्याचा जल्लोष करण्यासाठी आझाद मैदानात येणार होते. त्यामुळे महापालिकेच्यावतीने पुन्हा याच प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती. या दोन्ही दिवसांच्या प्रसाधनगृहाच्या व्यवस्थेसाठी तब्बल १ हजार सार्वजनिक फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली होती.
 तर महापालिकेच्या कारभारावर टीका …
महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे काम पूर्वनियोजित नसल्याने तसेच तातडीने आणि सार्वजनिक आरोग्य विभागाशी निगडीत असल्याने या तीन कंपन्यांकडून तातडीची बाब म्हणून ही व्यवस्था केली होती. परंतु ही सर्व व्यवस्था केल्यानंतर जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा आझाद मैदानात आला नाही. परंतु यासाठी केलेल्या व्यवस्थेचे पैसे तर संबंधित कंपन्यांना द्यावेच लागणार आहे. आणि मोर्चा येण्याची वाट पाहून जर ही व्यवस्था केली असती तर महापालिकेच्या कारभारावर टीका होण्याची शक्यता होती, त्यामुळे तातडीने ही व्यवस्था करण्यात आली होती,असे असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
 मराठा क्रांती मोर्चा आंदोलनासाठी पोर्टेबल टॉयलेट्सचा पुरवठा
  क्रॉसफिट कंपनी : ३५० टॉयलेट्सचा पुरवठा , ४९ लाख रुपये
   क्रिष्णा एंटरप्रायझेस: ३०० टॉयलेट्सचा पुरवठा ,४२ लाख रुपये
  सक्षम एंटरप्रायझेस :  ३५० टॉयलेट्सचा पुरवठा  , ४९ लाख रुपये
हेही पहा –
https://www.youtube.com/watch?v=TP4SXemQAEk&t=576s
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.