Maharashtra Board 10th, 12th Result 2023: दहावी-बारावीच्या निकालाची तयारी आता युद्धपातळीवर सुरू

161
Maharashtra Board 10th, 12th Result 2023: दहावी-बारावीच्या निकालाची तयारी आता युद्धपातळीवर सुरू
Maharashtra Board 10th, 12th Result 2023: दहावी-बारावीच्या निकालाची तयारी आता युद्धपातळीवर सुरू

सीबीएसई बोर्डच्या दहावी-बारावीच्या निकालानंतर आता महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावीच्या निकालाची तयारी युद्धपातळीवर सुरू झाली आहे. याचे ९० टक्के कामकाज पूर्ण झाले आहे. पहिल्यांदा बारावीचा निकाल ३ ते ४ जून रोजी जाहीर होईल. तर दहावीचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर करण्याच्या दृष्टीने बोर्डाकडून नियोजन सुरू आहे.

पुणे बोर्डाच्या माध्यमातून फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा झाली होती. कोरोनानंतर पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्यात आली, पण त्यावेळी कॉपीमुक्त परीक्षेसाठी ‘नांदेड पॅटर्न’ राबविला. त्यामुळे निश्चितपणे कॉपी प्रकरणांमध्ये मोठी घट झाल्याचे पहायला मिळाले. परीक्षेनंतर शिक्षकांनी मुदतीत उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे.

(हेही वाचा – CBSE 10th Result 2023 : सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकालही जाहीर)

सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी झाल्यावर आता निकालाची तयारी सुरू झाली आहे. बोर्डाकडून निकालाच्या दृष्टीने आवश्यक ९० टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दहावी-बारावीनंतर पुढील प्रवेशासाठी विलंब होणार नाही, याची खबरदारी बोर्डाकडून घेतली जात आहे. त्याअनुषंगाने निकाल वेळेत लागावेत, असे नियोजनही बोर्डाने केले आहे. पहिल्यांदा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.