CBSE 10th Result 2023 : सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकालही जाहीर

यावर्षीच्या निकालाची टक्केवारी ९३.१२% असून मागील वर्षीच्या तुलनेत निकाल १.२८ टक्क्यांनी घसरला आहे.

184
CBSE 10th Result 2023
CBSE 10th Result 2023 : सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकालही जाहीर

इयत्ता बारावी पाठोपाठ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे म्हणजेच सीबीएसई (CBSE 10th Result 2023) बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकालही जाहीर झाला आहे. शुक्रवार १२ मे या एकाच दिवशी दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षीच्या निकालाची टक्केवारी ९३.१२% असून मागील वर्षीच्या तुलनेत निकाल १.२८ टक्क्यांनी घसरला आहे.

(हेही वाचा – CBSE 12th Result 2023 : सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; या वेबसाईटवर पहा निकाल)

मागील वर्षी (CBSE 10th Result 2023) दहावीचा निकाल ९४.४० टक्के लागला होता. सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा १४ फेब्रुवारी ते २१ मार्च दरम्यान झाल्या होत्या. या परीक्षेसाठी एकूण २१,८६,४८५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ९३.१२ टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून ७ टक्के मुले नापास झाली आहेत. इयत्ता बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण ९४.२५ टक्के असून मुलांचे प्रमाण ९२.७२ टक्के आहे. (CBSE 10th Result 2023)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.