जाब विचारणाऱ्या व्यापाऱ्याच्या अंगावर थेट चढवला ट्रक; व्यापाऱ्याचा जागीच मृत्यू

176
जाब विचारणाऱ्या व्यापाऱ्याच्या अंगावर थेट चढवला ट्रक; व्यापाऱ्याचा जागीच मृत्यू
जाब विचारणाऱ्या व्यापाऱ्याच्या अंगावर थेट चढवला ट्रक; व्यापाऱ्याचा जागीच मृत्यू

मोटारीला ट्रक घासून गेल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या व्यापाऱ्याच्या अंगावर ट्रक चढवण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री मुलुंड पूर्व आनंद नगर टोल नाका येथे घडली. या घटनेत व्यापाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी नवघर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून ट्रकसह पळून गेलेल्या ट्रक चालकाला शुक्रवारी भिवंडी येथून अटक करण्यात आली आहे.

नक्की घटना काय?

नूर मोहम्मद अली असे अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव असून तो उत्तर प्रदेश राज्यातील राहणारा आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे राहणारे भांड्याचे व्यापारी मनीष सोनी (३६) हे त्यांचा पुतण्या भावेश सोनी यांच्यासोबत गुरुवारी रात्री मुंबई येथून ठाण्याच्या दिशेने स्विफ्ट मोटारीने जात होते. भावेश हा मोटार कार चालवत असताना मुलुंड टोल नाक्याच्या अलीकडे टाटा कंपनीचा ट्रक जी जे १६ -ए यु ४५८० हा मोटारीला घासून पुढे निघून गेला. दरम्यान भावेश याने ट्रकचा पाठलाग केला असता ट्रक आनंद नगर टोल नाका येथे मिळून आला. भावेश याने मोटार बाजूला लावून तो आणि त्याचे काका मनीष सोनी हे दोघे ट्रक चालकाला जाब विचारण्यासाठी ट्रकच्या समोर येऊन थांबले. यावेळी त्याला ट्रक चालकाला खाली उतरण्यास सांगू लागताच ट्रक चालकाने मागे पुढे न बघता ट्रक सुरू करून थेट काका पुतण्याच्या अंगावर चढवत असताना सावध असलेले मनीष सोनी हे बाजूला झाले मात्र भावेशच्या अंगावरून ट्रक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

(हेही वाचा – फेसबुक, इन्स्टाग्रामवर चाईल्ड प्रोनोग्राफी प्रकरणी ३ गुन्हे दाखल)

ट्रक चालक नूर मोहम्मद अली याने ट्रक न थांबवता ट्रकसह ठाण्याच्या दिशेने पळ काढला, या घटनेची माहिती मिळताच नवघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून तट्रक चालक विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला. नवघर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी ट्रक चालक नूर मोहम्मद अली याला उत्तर प्रदेशात पळून जाण्यापूर्वी भिवंडी येथून ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेत मृत झालेला भावेश सोनी आणि काका मनीष सोनी हे भिवंडीत राहणारे असून त्याचा भांड्याचा पारिवारिक व्यवसाय असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.