गोराईकडे जाणारा रस्ता ६०० मीटर झाला रुंद; बाधित ३२६ झोपड्यांवर कारवाई

228
गोराईकडे जाणार रस्ता ६०० मीटर झाला रुंद; बाधित ३२६ झोपड्यांवर कारवाई
गोराईकडे जाणार रस्ता ६०० मीटर झाला रुंद; बाधित ३२६ झोपड्यांवर कारवाई

बोरीवली (पश्चिम) येथील गोराईतील ग्लोबल पॅगोडा तसेच गोराई समुद्र किनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणात बाधित असलेल्या ३२६ झोपड्या मुंबई महानगरपालिकेच्या आर-मध्य विभागाने शुक्रवारी, १२ मे २०२३ रोजी जमीनदोस्त केल्या. या ३२६ पैकी १३३ झोपडीधारकांना पात्र ठरवून त्यांचे मल्हारराव कुलकर्णी रस्त्यावरील प्रकल्पबाधितांसाठी असलेल्या इमारतीत पुनर्वसन करण्यात आले. या झोपड्यांवर कारवाई केल्याने गोराईच्या या रस्त्याचे रुंदीकरण होऊन यावरील बकालपणा दूर होत पर्यटकांनाही आता सुरक्षित प्रवासाची भावना निर्माण झाली आहे.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त (परिमंडळ ७) भाग्यश्री कापसे, आर-मध्य विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी ही धडक कारवाई केली. या कारवाईप्रसंगी मुंबई महानगरपालिकेचे २०० कर्मचारी, ३० अधिकारी उपस्थित होते. तसेच ७० पोलिसांचा ताफादेखील यावेळी हजर होता. या झोपड्या पाडल्या नंतर जवळपास ६०० मीटरचा रस्ता रहदारीसाठी खुला झाला.

ग्लोबल पॅगोडा तसेच गोराई समुद्र किनाऱ्याकडे जाणाऱ्या पर्यटकांना गोराई रोडवरूनच ये-जा करावी लागते. त्यातील बहुसंख्य पर्यटक गोराई गावातील विविध ठिकाणी भेटही देतात. परंतु या रस्त्यावर सन १९९५ पासून महात्मा फुले नगर झोपडपट्टी अस्तित्वात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे.

(हेही वाचा – चेंबूर अमरमहल पुलाखालील लाईटींगवरच सुमारे दीड कोटींचा खर्च)

गोराई समुद्र किनारा येथील पर्यटनाला चालना मिळावी तसेच रस्ता रहदारीसाठी खुला व्हावा यासाठी ही कारवाई करण्यात आली. या परिसरात पर्यटकांनी यावे, पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी या हेतूने मुंबई महानगरपालिकेने विविध सुशोभीकरणाची कामेही केली आहेत.

महानगरपालिकेने महात्मा फुले नगर झोपडपट्टीतील ३२६ झोपड्यांची पात्रता ठरवण्याकरिता परिशिष्ट २ प्रसिध्द करून त्यातील जवळपास १३३ झोपड्या पात्र ठरल्या. त्यानंतर पात्र झोपडीधारकांचे मल्हारराव कुलकर्णी रस्त्याजवळील प्रकल्पबाधितांसाठी बांधलेल्या इमारतीत पुनर्वसन करण्यात आले. उर्वरित ४० झोपडीधारक सशुल्क पुर्नवसनांसाठी पात्र ठरतील, असे आर मध्य विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.