पहलगामची पुनरावृत्ती! Kulgam मध्ये नावं आणि धर्म विचारून दोन हिंदू मजुरांची हत्या; ‘लष्‍कर-ए-तैयबा’ने स्‍वीकारली हल्‍ल्‍याची जबाबदारी

पहलगामची पुनरावृत्ती! Kulgam मध्ये नावं आणि धर्म विचारून दोन हिंदू मजुरांची हत्या; 'लष्‍कर-ए-तैयबा'ने स्‍वीकारली हल्‍ल्‍याची जबाबदारी

92
Kulgam Terror Attack
Kulgam Terror Attack

दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी शुक्रवारी ३१ जुलैला रात्री वीटभट्टीवर काम करणाऱ्या छत्तीसगडमधील दोन स्थलांतरित मजुरांची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, या दहशतवाद्यांनी स्थलांतरित कामगारांना त्यांची नावं आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्याचे समोर आले आहे. यामुळे या घटनेला २०२५ च्या पहलगाम हल्ल्याची पुनरावृत्ती म्हटले जात आहे.(Kulgam Terror Attack)

(हेही वाचा : “स्वातंत्र्याचा अर्थ केवळ मनमानी नसून…”; NSA Ajit Doval यांनी जेनझींना काय आवाहन केले?)

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, कुलगाममधील केल्लम परिसरातील एका वीटभट्टीवर हे दोघे मजूर काम करत होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी तेथे येऊन दोघांची नावे विचारल्यानंतर त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात छत्तीसगडमधील महेंद्र कुमार आणि दीपक रात्रे या दोघांचा मृत्यू झाला. या भागात काम करणाऱ्या बिगर काश्मिरी मजुरांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने स्वीकारल्याचे वृत्त आहे.(Kulgam Terror Attack)

(हेही वाचा : CJP सरकारच्या रडारवर, फॉरेन फंडिंगची सखोल चौकशी होणार; मंत्र्यांचा थेट इशारा!)

जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला केला आहे. तसेच त्यांनी सुरक्षा दलांना शोधमोहीम तीव्र करण्याचे निर्देश दिले आहेत. “कुलगाममधील अमानुष दहशतवादी हल्ल्यात छत्तीसगडच्या मजुरांचा मृत्यू झाला आहे. मी या भ्याड कृत्याचा तीव्र निषेध करतो. मी सुरक्षा दलांना आपली कारवाई तीव्र करून दहशतवाद्यांना ठार करण्याचे निर्देश दिले आहेत.”(Kulgam Terror Attack)

(हेही वाचा : Jammu-Kashmir: कुलगाममधील दहशतवादी हल्ल्यात छत्तीसगडच्या दुसऱ्या मजुराचाही मृत्यू)

या भ्याड हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करून अतिरेक्यांच्या शोधासाठी मोठी शोधमोहीम सुरू केली आहे. या घटनेमुळे काश्मीर खोऱ्यात काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.(Kulgam Terror Attack)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.