Uttar Pradesh मधील वाँटेड गँगस्टर निशांत सिंग याला मुंबईत अटक

ओळख लपवून हॉटेल परिसरात वावरणाऱ्या 'गँग लीडर'ला येलोगेट पोलिसांच्या बेड्या.

95
Uttar Pradesh मधील वाँटेड गँगस्टर निशांत सिंग याला मुंबईत अटक
Uttar Pradesh मधील वाँटेड गँगस्टर निशांत सिंग याला मुंबईत अटक

राजधानी मुंबईत (Mumbai) ओळख लपवून वावरत असलेल्या आणि उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बहुचर्चित ‘गँगस्टर कायद्या’ (Gangsters Act) अंतर्गत पाहिजे असलेला एक सराईत गँग लीडर मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) जाळ्यात अडकला आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या दक्षिण परिमंडळ-३ अंतर्गत येणाऱ्या येलोगेट पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट माहिती संकलन, तात्काळ प्रतिसाद आणि आंतरराज्यीय समन्वयाचे उत्तम उदाहरण देत या कुख्यात गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. निशांत राजेश सिंग (Nishant Singh) (वय २३, रा. ग्राम बलोरीया, थाना – सिधौली, तहसील – सिधौली, जि. सितापूर, उत्तर प्रदेश) असे पकडण्यात आलेल्या गँगस्टरचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३० जुलै रोजी येलोगेट पोलीस ठाण्याचे दिवसपाळी पर्यवेक्षक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे (Nilesh Kamble) यांना एक गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, बेव्ह्यू हॉटेल परिसरात एक संशयित इसम संशयास्पद रित्या वावरत आहे. या माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पो.नि. निलेश कांबळे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि शोध मोहीम राबवून शिताफीने संशयित निशांत सिंग यास ताब्यात घेतले.

सुरुवातीच्या चौकशीत या इसमाने स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न करत पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, त्याच्या संशयास्पद वर्तनामुळे पोलिसांनी त्यास सखोल चौकशीसाठी येलोगेट पोलीस ठाण्यात आणले. तेथे तांत्रिक पडताळणी आणि चौकशीदरम्यान त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा पर्दाफाश झाला.

(हेही वाचा – Dombivli Doctor Assault Case : शास्त्रीनगर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अटारिया पोलीस ठाणे, जिल्हा सितापूर येथे याच्याविरुद्ध गु.र.क्र. १६७/२०२६, कलम २ (ब) (प) व ३(१) उत्तर प्रदेश गिरोहबंद समाजविरोधी क्रियाकलाप (निवारण) अधिनियम, १९८६ (Gangsters Act) अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. तो या गुन्ह्यातील मुख्य आरोपी व गँग लीडर असून उत्तर प्रदेश पोलिसांना अत्यंत हवे असल्याचे स्पष्ट झाले.

येलोगेट पोलिसांनी तात्काळ उत्तर प्रदेशातील अटारिया व सिधौली पोलिसांशी संपर्क साधून आरोपीचे छायाचित्र व तपशील पाठवून पडताळणी केली. उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक तातडीने मुंबईत दाखल झाले. कागदोपत्री प्रक्रिया आणि ओळख पटवल्यानंतर, १ ऑगस्ट रोजी सदर आरोपीचा ताबा सिधौली पोलीस ठाण्याच्या पथकाकडे रितसर सुपूर्द करण्यात आला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.