“स्वातंत्र्याचा अर्थ केवळ मनमानी नसून…”; NSA Ajit Doval यांनी जेनझींना काय आवाहन केले?

“स्वातंत्र्याचा अर्थ केवळ मनमानी नसून...”; NSA Ajit Doval यांनी जेनझींना काय आवाहन केले?

101
NSA Ajit Doval
NSA Ajit Doval

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल(Ajit Doval)यांना पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी डोवाल यांनी टिळक स्मारक ट्रस्टचे आभार मानले. डोवाल यांनी यावेळी बोलताना लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण केली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी नागरिकांना राष्ट्रनिर्माणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. विशेषतः जेनझींना स्वातंत्र्याची खरी व्याख्या समजून घेण्याचे आणि देशाच्या विकासासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.(Ajit Doval Speech Pune)

(हेही वाचा : “टिळकांच्या नजरेतून भगवद्गीता वाचा, तुम्ही आयुष्यात…”; केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांचा तरुणांना सल्ला, नेमकं काय म्हणाले?

स्वातंत्र्याचा अर्थ केवळ मनमानी नाही

देशातील तरुणांनी टिळकांच्या राष्ट्रनिर्माणाच्या विचारांचा अभ्यास करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. युवकांना हे समजून घ्यावे लागेल की स्वातंत्र्याचा अर्थ केवळ आपल्या मर्जीनुसार काहीही करण्याची मनमानी नाही. आजच्या पिढीला याचा खरा अर्थ समजून घ्यावा लागेल, देशाच्या स्वातंत्र्यामागे एक मोठा संघर्ष आणि इतिहास आहे. हे दीर्घ काळ चाललेल्या संघर्षानंतर मिळाले आहे. देशाला सक्षम आणि सुरक्षित बनवण्यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे, विशेषतः नव्या पिढीने राष्ट्रहितासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी देशातील तरुणांना केले आहे. (Ajit Doval Speech Pune)

(हेही वाचा : Ajit Doval Pune : “पडद्यामागे राहून देशाची सुरक्षा सांभाळणारे चाणक्य”; मुख्यमंत्री फडणवीसांकडून डोवाल यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव)

लोकमान्य टिळकांबाबत डोवाल काय म्हणाले?

स्वातंत्र्यलढ्यातील टिळकांच्या योगदानावर भाष्य करताना टिळकांचे बलिदान सर्वोच्च असल्याचे नमूद केले. “लोकमान्य टिळकांबाबत मी वयाच्या पाचव्या वर्षी पहिल्यांदा ऐकलं, पुण्यात शिक्षण घेत असताना टिळकांच्या विचारांवरील व्याख्यान ऐकले होते. त्यावेळी कधी वाटले नव्हते की अनेक वर्षांनी त्यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळेल, त्यानंतर आज ७६ वर्षांनी पुण्यातच त्यांच्याच नावे पुरस्कार मिळतोय हे मी माझं सौभाग्य समजतो”, असे अजित डोवाल म्हणाले. (Ajit Doval Speech Pune)

 

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.