Indonesia Ferry Fire : प्रवासी बोटीला भीषण आग; ५ जणांचा मृत्यू, तर ४१ प्रवासी अद्याप बेपत्ता

90
Indonesian ferry engulfed in flames with passengers in distress.
A tragic fire incident on an Indonesian ferry.

इंडोनेशियाच्या सागरी हद्दीत मदुरा बेटाजवळ एका मोठ्या प्रवासी बोटीला लागलेल्या भीषण आगीत किमान पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून ४१ जण अजूनही बेपत्ता आहेत. या प्रवासी जहाजावर कॅप्टनसह आणि क्रू सदस्यांसह एकूण २७१ जण प्रवास करत होते. आग लागल्यानंतर जीवाच्या आकांताने अनेक प्रवाशांनी समुद्रात उड्या घेतल्या. बचाव पथकांनी तातडीने धाव घेत २२५ प्रवाशांना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले असून बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी समुद्रात मोठी मोहीम राबवली जात आहे. (Indonesia Ferry Fire)

(हेही वाचा – Ganeshotsav 2026 : कोकणवासीयांना गणेशोत्सवाची भेट; सीएसएमटी-सावंतवाडी रोड दैनिक एक्स्प्रेसला मंजुरी )

प्रवासादरम्यान दुर्घटना आणि मदतकार्यातील आव्हाने
हे जहाज पूर्व जावा प्रांतातील सुराबाया बंदरावरून दक्षिण सुलावेसी येथील मकासार शहराकडे जात होते. जावाच्या ईशान्य किनारपट्टीवर पोहोचताच अचानक जहाजाला आग लागली आणि संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. दुर्घटनेची माहिती मिळताच नौदलाची आणि स्थानिक प्रशासनाची अनेक जहाजे घटनास्थळी दाखल झाली. जहाजावर मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील पदार्थ असल्याने इतर जहाजांना जवळ जाण्यात अडथळे येत होते, तरीही आसपासच्या मच्छीमारांच्या मदतीने शेकडो लोकांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.  (Indonesia Ferry Fire)

(हेही वाचा – KDMC च्या शाश्वत शून्य कचरा मोहिमेस डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद )

इंडोनेशियातील सागरी अपघातांची मालिका
इंडोनेशिया हा हजारो बेटांचा देश असल्याने तिथे जलवाहतूक मोठ्या प्रमाणावर चालते, मात्र सुरक्षा नियमांच्या दुर्लक्षामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत असतात. गेल्या वर्षी जुलै महिन्यातही उत्तर सुलावेसी भागात एका जहाजाला लागलेल्या आगीत तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तसेच काही वर्षांपूर्वी मोलुक्का समुद्रात अशाच प्रकारे एका बोटीला आग लागली होती, ज्यात सुदैवाने सर्व १८१ प्रवाशांना वाचवण्यात यश आले होते. सद्यस्थितीतील आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, परंतु प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.