IND VS PAK : श्रीलंकेच्या विरोधातील विजय पाकिस्तानने पॅलेस्टाईनला अर्पण केला, आता पराभव कुणाला अर्पण करणार?

102

ICC Cricket World Cup 2023 मधील शनिवार, १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान असा महामुकाबला रंगला. यामध्ये भारताने पाकिस्तानचा ७ विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर मात्र एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले.

श्रीलंकेच्या विरोधात पाकिस्तानने ३२८ धावांचे लक्ष्य गाठत ऐतिहासिक विजय मिळवला होता, त्यावेळी आक्रमक खेळी खेळणारा रिजवान याने पाकिस्तानचा विजय पॅलेस्टाईनमधील आमच्या बांधवांना अर्पण करत आहोत असे म्हटले होते, आता भारताच्या विरोधात पराभव झाल्यानंतर नेटकरी ‘हा पराभव कुणाला अर्पण करणार’ अशी विचारणा करू लागले आहेत.

श्रीलंकेच्या विरोधातील सामन्यात पाकिस्तानने ३२८ धावांचे लक्ष्य गाठत श्रीलंकेच्या तोंडून विजय हिसकावून घेतला होता. त्यावेळी या सामन्यात आक्रमक खेळी खेळणारा रिजवान याने आम्ही हा विजय आमचे पॅलेस्टाईनचे बांधव यांना अर्पण करत आहोत, असे म्हटले होते. श्रीलंकेच्या विरोधात ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला, त्यांनी आम्ही भारताच्या विरोधातही अशीच खेळी करून विजय मिळवू असा आत्मविश्वास व्यक्त केला, मात्र भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या आक्रमक खेळीने भारताने पाकिस्तानने उभे केलेले १९२ धावांचे लक्ष्य ३० षटकांतच पूर्ण केले. आता नेटकरी यांनी रिजवानला आठवण करून देत हा पराभव कुणाला अर्पण करणार, अशी विचारणा करू लागले आहेत.

(हेही वाचा : World Cup 2023 : भारतीय संघाने उडवला बाबर सेनेचा धुव्वा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.