Mahila Bachat Gat : दिल्ली हाटच्या धर्तीवर महिला बचत गटांचा आठवडी बाजार मुंबईत

रविवारी होणार पहिल्या आठवडी बाजाराचे उद्घाटन

273
Mahila Bachat Gat : दिल्ली हाटच्या धर्तीवर महिला बचत गटांचा आठवडी बाजार मुंबईत
Mahila Bachat Gat : दिल्ली हाटच्या धर्तीवर महिला बचत गटांचा आठवडी बाजार मुंबईत

दिल्ली हाटच्या धर्तीवर मुंबईत महिला बचत गटांच्या उत्पादीत वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबईतील महिला बचत गटांचा हा पहिल्या आठवडी बाजाराचा शुभारंभ रविवारी होत असून जोगेश्वरी पूर्व येथील मातोश्री मिनाताई ठाकरे शिल्पग्राम या उद्यानातील जागेमध्ये हा आठवडी बाजार भरवला जाणार आहे. याठिकाणी प्रत्येक आठवडी बाजारात ६० ते ७० महिला बचत गट सहभागी होणार आहे, आणि प्रत्येक आठवड्यातील शुक्रवार, शनिवार आणि रविवारी या तिन्ही दिवशी हा आठवडी बाजार सर्वांसाठी खुला राहणार आहे. (Mahila Bachat Gat)

मुंबईतील महिला बचत गटांना आर्थिक सक्षम बनवण्याचे काम महापालिकेच्या नियोजन विभागाच्यावतीने केले जाते. महिला बचत गटांमधील महिलांना प्रशिक्षणासह आर्थिक मदत नियोजन विभागाच्या माध्यमातून दिली जाते, तसेच निराधार महिलांसह इतर महिलांनाही विविध प्रशिक्षण देत त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न महापालिकेच्या नियोजन विभागाच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे या महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महिला बचत गटांचा आठवडी बाजार हा दिल्ली हाटच्या धर्तीवर आयोजित करण्याचा निर्णय महापालिका नियोजन विभागाने घेतला आहे. (Mahila Bachat Gat)

उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सूचनेनुसार नियोजन विभागाच्या संचालक प्राची जांभेकर यांनी महिला बचत गटांचा आठवडी बाजार भरवण्याचे आयोजन करत यासाठी प्रायोगिक तत्वावर हा बाजार जोगेश्वरी पूर्व येथील शिल्पग्राम उद्यानात भरवण्याचे नियोजन केले. त्यानुसार रविवारी १५ ऑक्टोबर रोजी या आठवडी बाजाराचे उद्घाटन उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या उद्घटन प्रसंगी युएनडीपीच्या आफ्रिन सिध्दीकी, अमेरिका वाणिज्य दूत कार्यालयाच्या पब्लिक डिप्लोमसी ऑफिसर सीटा रैटा यांच्या उपस्थितीत आणि महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. (Mahila Bachat Gat)

(हेही वाचा – Asian Games : एशियन गेम्स विजेत्यांना ‘युपी’ सरकारने भरभरून दिले; महाराष्ट्रातील खेळाडू मात्र उपेक्षित)

महिला बचत गटांच्या आठवडी बाजाराचे उद्घाटन झाल्यानंतर पुढील आठवड्यातील दर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी या आठवडी बाजाराचे आयोजन केले जाणार आहे. प्रत्येक आठवडी बाजारात ६० ते ७० महिला बचत गटांची क्षमता आहे. मुंबईतील सर्व महिला बचत गटांना प्रत्येक आठवड्याला आळीपाळीने सामावून घेऊन त्यांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न महापलिकेच्यावतीने केला जाणार आहे. रविवारी घटस्थापना होत असून महिला ही आदिशक्ती असल्याने या महिलांच्या सक्षमीकरणासाठी महापालिकेने या दिवसाची निवड केल्याचे बोलले जात आहे. महिला बचत गटांचा आठवडी बाजार हा शहरी वस्तीस्तर संघाच्या मार्फत नियोजन विभागाच्या पुढाकाराने भरवला जाणार आहे. या शिल्पग्राममधील आठवडी बाजाराच्या प्रतिसादानंतर मुंबईतील इतर उद्यानाच्या जागांमध्येही अशाप्रकारे आयोजन केले जाणार असल्याचे माहिती विभागाने दिली आहे. (Mahila Bachat Gat)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.