Crime News: सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई, ३७०० किलो सिगारेट्स नष्ट

63
Crime News: सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई, ३७०० किलो सिगारेट्स नष्ट
Crime News: सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई, ३७०० किलो सिगारेट्स नष्ट

अवैधरित्या आयात झालेल्या सिगारेट, तंबाखू प्रशासनिक सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाच्या सुरू असलेल्या विशेष अभियानाअंतर्गत नष्ट करण्यात आल्या आहेत. मुंबई विमानतळ सीमा शुल्क आयुक्तालयाकडून मोठ्या प्रमाणावर सीएसएमआय विमानतळ प्रवाशांकडून हे या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

मुंबई विमानतळ सीमाशुल्क विभागाने जप्त केलेल्या ३७०० किलो सिगरेटची किंमत बाजारभावानुसार, २.८० कोटी रुपये असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाकडून देण्यात आली. तळोजा येथील मुंबई घनकचरा व्यवस्थापन लिमिटेड येथे कचरा जाळण्याच्या सुविधा केंद्रात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून (एमपीसीबी) ही कारवाई करण्यात आली. घातक आणि इतर कचरा (एम अँड टीएम) नियम २०१६ अंतर्गत या प्रतिबंधित सिगारेट नष्ट करण्यात आल्या.

(हेही वाचा –Pravin Darekar : एका विशिष्ट समाजातून येत असल्याने, देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केले जातेय )

मुंबई विमानतळ अधिकाऱ्यांनी चालू आर्थिक वर्षात या प्रतिबंधित सिगारेट जप्त (3700 kg cigarettes destroyed) केल्या आहेत. सीमाशुल्क कायदा, १९६२ आणि सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरात प्रतिबंध, व्यापार आणि वाणिज्य, उत्पादन पुरवठा आणि वितरण कायदा, 2003 (सीओटीपीए, २००३) च्या नियमनाच्या तरतुदींचे उल्लंघन करून भारतात या सिगरेटची तस्करी झाली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.