Bhiwandi Fire : भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग, संपूर्ण गोडाऊन जळून खाक

तब्बल दोन तास ही आग धुमसत होती

21
Bhiwandi Fire : भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग, संपूर्ण गोडाऊन जळून खाक

भिवंडी मधील एका केमिकल कंपनीला भीषण आग (Bhiwandi Fire) लागल्याने परिसरात खळबळ उडाली. भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्ट्यातील पूर्णा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दालमिल कंपाऊंडमध्ये एका केमिकलच्या गोदामाला भीषण आग लागली. सोमवार ११ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ही घडली. या दुर्घटनेत संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले आहे. तब्बल दोन तास ही आग धुमसत होती.

(हेही वाचा – India Vs Pakistan Asia Cup : आशिया चषकाच्या सुपर फोर लढतीत भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा)

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Bhiwandi Fire) दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यांचे आग विझवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु होते मात्र गोदामातील केमिकल ज्वलनशील असल्याने या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना अनेक अडचणी येत होत्या.

ही आग (Bhiwandi Fire) आचानक लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या केमिकल गोदामात मोठ्या प्रमाणात केमिकल फॉर्म पावडर तसेच, केमिकलचे ड्रम्स आणि डिंक होते. गोदामात लागलेल्या आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही, पण या घटनेत लाखोंचं नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना या आगीवर (Bhiwandi Fire) दोन तासानंतर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.