Fire In Udyan Express: बंगळुरुमध्ये रेल्वे स्थानकावर थांबलेल्या उद्यान एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना लागली भीषण आग

94
Fire In Udyan Express: बंगळुरुमध्ये रेल्वे स्थानकावर थांबलेल्या उद्यान एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना लागली भीषण आग

हाती आलेल्या माहितीनुसार, बंगळुरुमधील एका रेल्वे स्थानकावर थांबलेल्या (Fire In Udyan Express) उद्यान क्रांतिवीर एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना भीषण आग लागली. संगोल्ला रायन्ना म्हणजेच केएसआर या रेल्वे स्थानकावर आज (शनिवार,१९ ऑगस्ट) ही आग लागली. उद्यान एक्स्प्रेसच्या दोन डब्यांमध्ये ही आग (Fire) पसरली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रेल्वे (Fire In Udyan Express) मुंबई ते बंगळुरु स्थानकादरम्यान धावते. तसेच या रेल्वेचा केएसआर हे शेवटचे स्थानक आहे. प्रवासी या रेल्वेमधून उतरल्यानंतर जवळपास दोन तासांनी या रेल्वेला आग लागली. त्यामुळे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

(हेही वाचा – Jasprit Bumrah : बुमराहचा यशस्वी कमबॅक; आयर्लंडचा डकवर्थ लुईस नियमांनुसार २ धावांनी पराभव)

उद्यान एक्स्प्रेसच्या (Fire In Udyan Express) बी 1 आणि बी 2 या दोन कोचमध्ये ही आग लागली. ही एक्स्प्रेस केएसआर या रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर उभी होती. सकाळी जवळपास 7:10 च्या सुमारास या गाडीमधून धुराचे लोट येऊ लागले. त्यानंतर या एक्सप्रेसमध्ये आग पसरल्याचं समोर आलं आहे.

अग्निशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र यामध्ये उद्यान एक्स्प्रेसचे दोन डबे आगीच्या (Fire In Udyan Express) भक्ष्यस्थानी पडले. तर सुदैवाने मोठी दुर्घटना होता होता टळली. दरम्यान रेल्वे प्रशासनाने ही आग कशामुळे लागली याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु या आगीचे कारण अद्यापही समोर आले नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.