BMC : मुंबईतील सहा मोटार गॅरेजवर जप्ती,  मालमत्ता कर थकवला

BMC : मुंबईतील मालमत्ताधारकांना दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन खात्याच्या वतीने वेळोवेळी केले जात आहे.

125
City Concrete Road : शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी अखेर २ कंत्राटदार पुढे आलेत होSS
City Concrete Road : शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी अखेर २ कंत्राटदार पुढे आलेत होSS
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 
वारंवार पाठपुरावा करुनही मालमत्ता कराची थकीत भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या मुंबईतील सहा ऑटो गॅरेज (Auto garage) मालमत्ताधारकांवर महानगरपालिकेच्या (BMC) वतीने शुक्रवारी (०३ मे २०२४) जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आली. या सहाही मालमत्ताधारकांकडे एकूण ४५ लाख ३५ हजार ३५९ रुपयांची कर थकबाकी आहे. ही थकीत रक्कम येत्या पाच दिवसांत न केल्यास जप्त केलेल्या मालमत्तेची लिलाव द्वारे विक्री करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. (BMC)
मुंबईतील मालमत्ताधारकांना दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या (BMC) करनिर्धारण आणि संकलन खात्याच्या वतीने वेळोवेळी केले जात आहे. तथापि, करभरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.  महानगरपालिकेच्या (BMC) ‘एस’ विभागाच्या चमूने शुक्रवारी टागोरनगर विक्रोळी (Vikroli) (पूर्व) परिसरातील सहा मोटार गॅरेज (Auto garage) मालमत्ताधारकांवर मुंबई महानगरपालिका (BMC) अधिनियम-१८८८ च्या कलम २०५ नुसार, जप्ती आणि अटकावणीची कारवाई केली. जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आलेल्या  मालमत्ताधारकांनी पुढील पाच दिवसांच्या आत करभरणा न केल्यास जप्त केलेल्या मालमत्तेची लिलावाद्वारे विक्री करण्यात येईल. (BMC)
दरम्यान, सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा करण्याचा अंतिम दिनांक २५ मे २०२४ आहे. मालमत्ताधारकांनी अंतिम देय मुदतीपूर्वी करभरणा न केल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कार्यवाही केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी त्यांच्या मालमत्तासंबंधी कराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. (BMC)
जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आलेल्या मालमत्ताधारकांची नावे…
  • शहरदीपसिंग धालीवाल (०१ लाख ८६ हजार ७०९ रुपये), 
  • अवतारसिंग गुरुमितसिंग (०२ लाख हजार २० रुपये),
  • अर्जुनसिंग गुरुमितसिंग (०६ लाख ४ हजार ८७७ रुपये), 
  • सुखविंदर कौर धालीवाल (०१ लाख ०३ हजार ८४ रुपये)  
  • दारासिंग धालीवाल (२७ लाख ८२ हजार ४९२ रुपये), 
  •  जगतारासिंग गुरुमितसिंग (०६ लाख ४ हजार ८७७ रुपये) 
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.