Heat waves: थंड हवेच्या ठिकाणी उष्णतेच्या झळा, पर्यटन व्यवसाय मंदावला!

103
Heat waves: थंड हवेच्या ठिकाणी उष्णतेच्या झळा, पर्यटन व्यवसाय मंदावला!
Heat waves: थंड हवेच्या ठिकाणी उष्णतेच्या झळा, पर्यटन व्यवसाय मंदावला!

गेल्या काही दिवसांपासुन प्रचंड उकाड्याने (Heat waves) नागरिक हैराण झाले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत तापमान (Heat waves) कमी होण्यास थोडासा दिलासा मिळू शकेल. तर, दक्षिणेकडील काही राज्यांना या आठवड्यात उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पण महाराष्ट्रात या आठवड्यात पावसाची शक्यता फारच कमी आहे. यामुळे महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या तीव्र उकाड्याने (Heat waves) थंड हवेची ठिकाणे तापून निघत असून थंडावा घेणाऱ्या पर्यटकांचा (tourism) ओघ तेथे ओसरला आहे.

कुटुंब पर्यटकांचा ओघ ओसरला

थंड हवेच्या ठिकाणांवर पर्यटकांना घाम फोडणारा उष्मा जाणवत आहे. त्यामुळे थंड हवेच्या ठिकाणी ऐन तेजीच्या दिवसात पर्यटन व्यवसाय ३० ते ४० टक्‌याने मंदावल्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेषतः कुटुंब पर्यटकांचा ओघ ओसरला आहे, असे दिसून येते. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर (Mahabaleshwar) , रायगड जिल्ह्यातील माथेरान (Matheran) व इतर थंड हवेच्या ठिकाणांवर मे महिन्याच्या हंगामी सुट्टीमध्ये पर्यटकांची रेलचेल असते. राज्यातील जवळपास एकवीस थंड हवेच्या ठिकाणी कमाल ३५ ते किमान ३९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद होत आहे. त्यामुळे या धगधगत्या उष्णतेपासून बचाव व्हावा म्हणून पर्यटक येथे येण्यास पाठ फिरवत आहेत. (Heat waves)

समुद्रकिनाऱ्यावर कमालीचे तापमान

गेल्या दहा-बारा दिवसांपासून तापमानाचा पारा चढताच आहे. कोकण विभागात काही ठिकाणी तर उष्म्याचा इशारा देण्यात आला. त्यामुळे माथेरान, सिंधुदुर्गमधील आंबोली, पालघरमधील मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेले जव्हार, लगतच असलेले मोखाडा तालुक्यातील सूर्यमाळ अशी प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणे उंच प्रदेशात असल्याने तेथे अति उष्णता जाणवत आहे. समुद्रकिनाऱ्यावर कमालीचे तापमान असल्यामुळे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. (Heat waves)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.