मुंबईत कोरोना पुन्हा वाढला… रविवारी ९ हजार ९८९ रुग्ण!

102

मुंबईत कमी होत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या आता हळूहळू वाढत जात आहे. रविवारी मुंबईत ९ हजार ९८९ रुग्ण आढळून आले आहेत. तर मृत्यूचा आकडाही झपाट्याने वाढत जात आहे. रविवारी एकूण ५८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, दिवसभरात केवळ ८ हजार ५५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत ९२ हजार ४६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अशी आहे मुंबईतील रुग्णसंख्या

मुंबईत शनिवारी ९ हजार ३२७ रुग्ण आढळून आले होते तर, ५० रुग्णांचा मृत्यू झाला होता. पण रविवारी ९ हजार ९८९ रुग्ण आढळून आले, तर ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये ४३ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे होते. ५८ रुग्णांमध्ये ४२ पुरुष आणि १६ महिलाचां समावेश आहे. मुंबईत सध्या १९ हजार १६८ रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यातील लक्षणे असलेल्या आणि गंभीर तसेच, दीर्घकालीन आजाराचे रुग्ण कोविड रुग्णालय व कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. लक्षणे नसलेले व सौम्य आजाराचे ५ हजार ९९४ रुग्ण हे सीसीसी टूमध्ये उपचार घेत आहेत. याशिवाय ९ हजार ९४६ रुग्ण हे आयसीयू बेडवर उपचार घेत आहेत. उर्वरित सर्व रुग्ण हे होम क्वारंटाईन होऊन घरीच उपचार घेत आहेत.

(हेही वाचाः लॉकडाऊनची तयारी… १४ एप्रिलनंतर होणार निर्णय?)

८७७ इमारती सील

आतापर्यंत ८१ झोपडपट्ट्या व चाळी या कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आल्या असून, सक्रीय सीलबंद इमारतींची संख्या ८७७ एवढी झाली आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कातील १ हजार ६० संशयित रुग्णांना सीसीसी वन मध्ये दाखल करण्यात आले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.