Country’s First Air Taxi: प्रदूषणापासून दिलासा देणाऱ्या पहिल्या हवाई टॅक्सीची होणार निर्मिती, काय आहेत वैशिष्ट्य? जाणून घ्या…

हा प्रकल्प पूर्ण झाल्यास हवाई टॅक्सीची निर्मिती करणारे मोहाली हे देशातील पहिले शहर असेल.

113
Country's First Air Taxi: प्रदूषणापासून दिलासा देणाऱ्या पहिल्या हवाई टॅक्सीची होणार निर्मिती, काय आहेत वैशिष्ट्य? जाणून घ्या...

आरामदायी प्रवास करायला कुठल्या प्रवाशाला आवडणार नाही? याकरिता टॅक्सी किंवा रिक्षा या वाहनांचा पर्याय आपल्याला सोयीचा वाटतो, मात्र यामुळे काही वेळा ट्रॅफिकमध्ये अडकणं, टॅक्सी वेळेत न मिळणं…अशा विविध समस्या, अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते, मात्र आता या समस्या भेडसावण्याची शक्यता फारच कमी आहे.

देशातील पहिली हवाई टॅक्सी पंजाबमधील मोहालीमध्ये तयार केली जाणार आहे. अनिवासी भारतीय असलेल्या कुलजित सिंग संधू यांनी हवाई टॅक्सी तयार करण्यासाठी मोहालीमध्ये प्रकल्प स्थापन करण्याबाबत पंजाब सरकारशी चर्चा केली आहे.

(हेही वाचा – Salman Khan : सलमान खानच्या निवास्थानाबाहेर गोळीबार, गॅलेक्सी अपार्टमेंटची सुरक्षा व्यवस्था वाढवली )

हा प्रकल्प पूर्ण झाल्यास हवाई टॅक्सीची निर्मिती करणारे मोहाली हे देशातील पहिले शहर असेल. इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेकऑफ अँड लँडिंग एअरक्राफ्ट (ई-विटोल) ही एक हवाई टॅक्सी आहे. यामुळे प्रदूषणापासून दिलासा तर मिळणार आहेच; पण हेलिकॉप्टरमुळे होणारे ध्वनिप्रदूषणही दूर होणार आहे. ई-विटोलमध्ये ऑटो पायलट मोड असून, त्यात पॅराशूटचीही सोय असणार आहे, असे नलवा एयरो कंपनीचे कुलजित सिंग संधू म्हणाले.

हवाई टॅक्सीची वैशिष्ट्ये –
वैशिष्ट्ये – ३५० किमी/तास सरासरी वेग
वजन – १४०० किलो
वहन क्षमता – ७०० किलो
एका चार्जवर ९० मिनिटे प्रवास करता येईल.
६५०० मीटर उंचीपर्यंत उड्डाण करण्यास हवाई टॅक्सी सक्षम.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.