BJP Manifesto : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध! पंतप्रधान मोदींनी केल्या १० मोठ्या घोषणा

439
BJP Manifesto : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध! पंतप्रधान मोदींनी केल्या १० मोठ्या घोषणा
BJP Manifesto : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध! पंतप्रधान मोदींनी केल्या १० मोठ्या घोषणा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी लोकसभा निवडणूक २०२४ साठी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा (BJP Manifesto) प्रसिद्ध झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्याला ‘मोदी की गारंटी’ हे नाव देण्यात आले आहे. जाहीरनामा (BJP Manifesto) प्रसिद्ध करताना पंतप्रधान नरेंद्र (PM Narendra Modi) मोदी, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी २५ जानेवारी २०२४ रोजी निवडणूक जाहीरनाम्यासाठी (BJP Manifesto) जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. त्यानंतर १५ लाखांपेक्षा जास्त सूचना आल्या होत्या. (BJP Manifesto)

जाहीरनाम्यात विशेष काय ?

या जाहीरनाम्यात (BJP Manifesto) रोजगाराच्या संधी, महिला सक्षमकरण आणि शेतकरी यांच्यावर विशेष भर देण्यात आला आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात (BJP Manifesto) उद्योजकतेवरही लक्ष देण्यात आलं आहे. गरिबांना पुढील ५ वर्षे मोफत धान्य मिळणार आहे. जेनरीक औषधी ८० टक्के स्वस्त देण्यात येणार आहे, ही आश्वासने आहे. तसेच ७० वर्षांवरील लोकांसाठी भाजपने मोठी घोषणा केली आहे. ७० वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती आयुष्यमान भारत योजनेत आणण्यात येणार आहे. प्रत्येकाला पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहे. गरिबांसाठी आणखी तीन कोटी घरे बांधण्याची योजना आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भाजप जाहीरनामा (BJP Manifesto) प्रसिद्ध करताना सांगितले. (BJP Manifesto)

निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींच्या १० मोठ्या घोषणा कोणत्या ?

  • रोजगार आणि उद्योजकतेभर भर.
  • पुढील पाच वर्षे गरीबांना मोफत धान्य.
  • आयुषमान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत विमा आणि मोफत उपचार, ७० वर्षांवरील वृद्धांना आयुषमान भारत योजनेचा लाभ मिळणार, तृतीयपंथीयांना आयुषमान भारत योजनेचा लाभ मिळणार.
  • गरीबांसाठी चार कोटी घरे बांधणार.
  • पाईपमार्फत स्वस्त गॅस घराघरात पोहोचवणार.
  • वीजबिलाचा शून्य करण्यासाठी काम करणार, कोट्यवधी कुटुंबांचे वीज बिल शून्यावर आणण्यासाठी आणि विजेपासून कमाईच्या संधी निर्माण करण्यासाठी आम्ही काम करू. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना लागू करणार.
  • गरीबांसाठी अनेक योजनांचा विस्तार.
  • कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष, देशात फूड प्रोसेसिंग हब बनणार, नॅनो युरियाच्या वापरावर भर देणार.
  • महिलांसक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार, ३ कोटी महिलांना लखपती दिदी करणार, महिलांना आयटी, टुरिझमकडे वळवणार, सर्व्हायकल कॅन्सरच्या उपचारावर भर.
  • मुद्रा योजना १० लाखांवरून २० लाखांवर, मुद्रा योजनेंतर्गत यापूर्वी १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात होते. आता ही मर्यादा वाढवून २० लाख करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मला विश्वास आहे की इंडस्ट्री ४.० च्या युगासाठी आवश्यक असलेली इकोसिस्टम तयार करण्यासाठी एक नवीन शक्ती म्हणून याचा वापर केला जाईल.

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.