Corona Update : भारतात २४ तासांत कोरोनाचे ८०० हून अधिक रुग्ण;लक्षणे सौम्य,मात्र काळजी घेण्याचे WHO चे आवाहन

गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये २२  टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८०० हून अधिक नवे रुग्ण आढळले असून, गेल्या सात महिन्यांतील एका दिवसातील हा उच्चांक आहे.

149
Corona Update : भारतात २४ तासांत कोरोनाचे ८०० हून अधिक रुग्ण;लक्षणे सौम्य,मात्र काळजी घेण्याचे WHO चे आवाहन

नवीन वर्ष सुरू झाले आहे, पण नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाच्या संख्येमुळे काहीसे चिंता वाढली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८०० हून अधिक नवे रुग्ण आढळले असून, गेल्या सात महिन्यांतील एका दिवसातील हा उच्चांक आहे. गेल्या आठवड्यात भारतात कोरोनाचे ४६५२ रुग्ण आढळले. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार कोरोना नवा व्हेरीयंट असलेल्या जेएन-1 (JN-1) ची प्रकरणे सतत वाढत आहेत. (Corona Update)

कोरोनाचा नवा सब व्हेरियंट जेएन-1 ((JN-1) ची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत जागतिक स्तरावर मोठी वाढ होत आहे.देशात गेल्या २४  तासांत कोरोनाच्या ८४१  रुग्णांची नोंद झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या ४३०९  वर पोहोचली आहे. भारतात आतापर्यंत जेएन-1 चे एकूण १७८  रुग्ण आहेत. ज्यामध्ये केरळमध्ये सर्वाधिक८३ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (Corona Update)

(हेही वाचा : LPG Price : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारची भेट ; एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात)

जगभरात JN.1 पसरतोय 
जागतिक स्तरावर यूएस काही युरोपीय देश,सिंगापूर आणि चीन मध्ये JN1 च्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे पाहावयास मिळत आहे. याबाबत डब्ल्यूएचओने सांगितले की, कोविड – १९ हॉस्पिटलायझेशन आणि अतिदक्षता विभागामध्ये गेल्या महिनाभरात ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर श्वसन रोगांच्या प्रकरणामध्ये वाढ होत आहे. नव्या व्हेरियंटमुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. तर कोरोनाचा नवीन व्हेरियंट वेगाने पसरत आहे पण, दिलासादायक बाब म्हणजे याची लक्षणे सौम्य आहेत मात्र काळजी घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.