Prime Minister Modi : वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी करणार तामिळनाडू, लक्षद्वीप, केरळचा दौरा

या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते देशाला अनेक रेल्वे प्रकल्प समर्पित केले जाणार आहेत. तसेच पंतप्रधान ९००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या महत्त्वाच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू प्रकल्पांची पायाभरणी करतील.

136
Prime Minister Modi : वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी करणार तामिळनाडू, लक्षद्वीप, केरळचा दौरा

नवीन वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) तामिळनाडू, लक्षद्वीप, आणि केरळचा दौरा करणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांचा हा तामिळनाडू दौरा अधिक लक्षवेशी ठरणार आहे.

तामिळनाडूमध्ये पंतप्रधान 

२ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता पंतप्रधान (Prime Minister Modi) तिरुचिरापल्ली, तामिळनाडू येथे पोहोचतील. तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विद्यापीठाच्या ३८ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधानांच्या हस्ते विद्यापीठातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करुन त्यांना पुरस्कार देण्यात येतील. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित देखील करणार आहेत.

(हेही वाचा – Ram Temple Threat : राम मंदिर, मुख्यमंत्री योगी आणि एसटीएफ प्रमुखांना उडवण्याची धमकी)

नवीन टर्मिनलमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठीच्या अत्याधुनिक सुविधा –

तिरुचिरापल्ली येथील सार्वजनिक कार्यक्रमात, पंतप्रधान (Prime Minister Modi) तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करतील. ११०० कोटींहून अधिक खर्च करून विकसित केलेल्या, दोन-स्तरीय नवीन आंतरराष्ट्रीय टर्मिनल इमारतीची वार्षिक ४४ लाखाहून अधिक प्रवाशांना सेवा देण्याची तर गर्दीच्या वेळेत सुमारे ३५०० प्रवाशांना सेवा देण्याची क्षमता आहे. नवीन टर्मिनलमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठीच्या अत्याधुनिक सुविधा आणि वैशिष्ट्ये निर्माण केली आहेत.

पंतप्रधानांच्या (Prime Minister Modi) हस्ते देशाला अनेक रेल्वे प्रकल्प समर्पित केले जाणार आहेत. तसेच कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान ९००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या महत्त्वाच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू प्रकल्पांचं राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. राष्ट्राला समर्पित होणाऱ्या दोन प्रकल्पांमध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) च्या IP101 (चेंगलपेट) ते IP 105 (सायलकुडी) विभागातील एन्नोर – थिरूवल्लूर – बंगळुरू – पुदुचेरी – नागपट्टीनम – मदुराई – तुतीकोरिन या ४८८ किमी लांबीच्या नैसर्गिक वायू पाइपलाइनचा तसेच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) च्या ६९७ किमी लांबीच्या विजयवाडा-धर्मपुरी बहुउत्पादन (POL) पेट्रोलियम पाइपलाइनचा (VDPL) समावेश आहे.

(हेही वाचा – LPG Price : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारची भेट ; एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात)

लक्षद्वीपमध्ये पंतप्रधान मोदी करणार विकास प्रकल्पांचे उद्घाटन –

लक्षद्वीप बेटांच्या दौऱ्यात, पंतप्रधान (Prime Minister Modi) ११५० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या काही विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील, काही प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील तर काही प्रकल्पांची पायाभरणी देखील करतील.

पंतप्रधानांच्या (Prime Minister Modi) हस्ते राष्ट्राला समर्पित करण्यात येणाऱ्या इतर प्रकल्पांमध्ये, कावरत्ती येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचा समावेश आहे, जो लक्षद्वीप बेटांवरचा पहिला बॅटरी सुविधेवर चालणारा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे डिझेल इंधनावर आधारित वीज निर्मिती प्रकल्पावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल; कावरत्ती येथील इंडिया रिझर्व्ह बटालियन कॉम्प्लेक्समध्ये नवीन प्रशासकीय इमारत आणि ८० पुरुषांसाठी राहण्याची व्यवस्था असलेल्या सुविधा प्रकल्प ही पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.