Ram Temple Threat : राम मंदिर, मुख्यमंत्री योगी आणि एसटीएफ प्रमुखांना उडवण्याची धमकी

भारतीय किसान मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र तिवारी यांना धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता आणि त्यात त्यांना ठार मारण्याची धमकीही देण्यात आली होती.

335
Ram Temple Threat : राम मंदिर, मुख्यमंत्री योगी आणि एसटीएफ प्रमुखांना उडवण्याची धमकी

एकीकडे येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी (Ram Temple Threat) अयोध्येत भगवान श्री राम यांच्या प्रतिष्ठापनेची भव्य तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे श्रीराम मंदिर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि एसटीएफ प्रमुखांना उडवण्याची धमकी देणारा मेल समोर आला आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

भारतीय किसान मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र तिवारी यांना धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्याने (Ram Temple Threat) आपण आयएसआयशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. यूपी-११२ च्या इन्स्पेक्टरच्या तक्रारीवरून सुशांत गोल्फ सिटी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. एटीएस आणि पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत आणि ई-मेलरचा शोध घेतला जात आहे. देवेंद्र तिवारी यांना झुबेर खान नावाच्या व्यक्तीच्या ई-मेल आयडीवरून धमकी देण्यात आली.

(हेही वाचा – ISRO’s Black Hole Mission : इस्रोच्या पहिल्या ‘ब्लॅक होल मिशन’चे यशस्वी प्रक्षेपण)

आम्ही राममंदिराच्या उत्सवाचे शोकात रुपांतर करू –

धमकीच्या (Ram Temple Threat) मेलमध्ये लिहिले आहे की; “आमचे लोक उत्तर प्रदेशात पोहोचले आहेत, आता राम मंदिर होणार नाही, देवेंद्र तिवारी किंवा योगी होणार नाहीत, त्यांना बॉम्बने उडवले जाईल. जे लोक उत्सवाची तयारी करत आहेत, आम्ही त्याचे शोकात रूपांतर करू.”

(हेही वाचा – Right to Health : राज्यात लवकरच येणार ‘राईट टू हेल्थ’ कायदा ; जाणून घ्या कसा होईल फायदा)

शेतकरी नेत्यांची पोलिसांत तक्रार – 

पोलिसांनी आयपीसी कलम ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शेतकरी नेते देवेंद्र तिवारी यांनी पोलिसांना सांगितले की, “मी देवेंद्र तिवारी, भारतीय किसान मंच आणि भारतीय गौ सेवा परिषदेचा राष्ट्रीय अध्यक्ष, लखनऊच्या बांथरा पोलीस ठाण्यातील निवाजी खेडा गावातील रहिवासी आणि सध्याचा पत्ता सी-4 सिंडर डंप कॉम्प्लेक्स, पोलीस स्टेशन आलमबाग, लखनऊ. माझ्या मेल आयडीवर मला बॉम्बची धमकी (Ram Temple Threat) देण्यात आली. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की कृपया माझा अहवाल नोंदवा आणि आवश्यक ती कारवाई करा.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.