Sudhakar Badgujar: ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस!

100
Sudhakar Badgujar: ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस!
Sudhakar Badgujar: ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस!

सलीम कुत्ता डान्स प्रकरणी सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) हे नाव राज्यभर चर्चेत आलं होतं. ऐन निवडणुकीच्या काळात सुधाकर बडगुजरांविरोधात नोटीस काढण्यात आली आहे. मात्र, सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी नोटीस घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. बडगुजर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत कायदेशीर सल्ला घेणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची नाशकातून पाठ फिरताच ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याविरोधात नोटीस आल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे. (Sudhakar Badgujar)

नेमकं प्रकरण काय?

उद्धव ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) सलीम कुत्ता प्रकरणी (Salim Kutta case) अडचणीत आले होते. दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सलीम कुत्ता यांच्या नाशिक येथील फार्महाऊसवर त्यानं लग्न केल्याचाही आरोप आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केलेली. नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते दाऊदच्या टोळीतील सदस्यासोबत पार्टी करताना आणि डान्स करताना आढळला. ज्याचा व्हिडीओ आणि फोटो भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी विधानसभेत दाखवले होते. हा मुद्दा दादाजी भुसे, आशिष शेलार यांनी उपस्थित केला होता. (Sudhakar Badgujar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.